PMC News : पुणे पालिकेचा लागला 'निकाल'; वेदभवनला साडेतीन कोटींची भरपाई द्यावीच लागणार...

Pune Corporation News : चांदणी चौकातील वेद भवन भूसंपादन मोबदला प्रकरणी कोर्टाचे आदेश..
PMC News
PMC News Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम करताना महापालिकेने ताब्यात घेतलेल्या जागेचा मोबदला म्हणून साडेतीन कोटी रुपये पालिकेला आता वेदभवनला द्यावे लागणार आहेत. कोर्टाने पालिकेची याचिका फेटाळून लावत, पालिकेच्या विरोधात निकाल दिल्याने ही रक्कम आता वेदभवन संस्थेला द्यावी लागणार आहे. यामुळे आता पालिकेला भुर्दंड सहन करावे लागणार आहे. (Latest Marathi News)

PMC News
Pune River Project News : केंद्राच्या योजनेत राज्याचा खोडा; जल शुद्धीकरण प्रकल्पाला जागा देण्यास नकार...

चांदणी चौकातील सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. गेले अनेक वर्षे येथे या भागात होत असलेल्या वाहतुकीच्या समस्येमुळे वाहनचालक आणि नागरिक हैराण झाले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला होता.

या भागातील होत असलेली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पाषाण-एनडीए रस्ता पुलाचे रुंदीकरण करण्यात आले. तसेच, या भागात उड्डाणपूल देखील उभारण्यात आला आहे. पाच महिन्यांपूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये या पुलाचे उद्घाटन देखील करण्यात आले आहे.

या भागातील वेद भवनच्या समोरच असलेल्या महामार्गाच्या खाली भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोथरूडकडून चांदणी चौकाच्या दिशेने जाणाऱ्यांसाठी आणखी एक मार्ग उपलब्ध होणार आहे.

मात्र ही जागा ताब्यात घेताना पालिकेने इतर खासगी जागा ताब्यात घेताना जसा मोबदला दिला, तसाच मोबदला वेदभवन ला द्यावा, अशी मागणी संस्थेकडून केली जात होती. मात्र, यासाठी पालिकेने नकार दिल्याने हा विषय कोर्टात गेला होता.

PMC News
Cantonment Board News: पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट परिसर मनपा पालिका हद्दीत येणार? आज महत्त्वाची बैठक...

वेदभवनला देण्यात आलेली जागा शासनाने बक्षीसपत्र म्हणून दिलेली आहे. सार्वजनिक हिताच्या कामासाठी ही जागा जेव्हा आवश्‍यक असेल तेव्हा विनामोबदला परत करावी लागेल, अशी अट देखील त्यावेळी टाकण्यात आली होती.

त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर महापालिकेने वेद भवनला मोबदला देता येणार नाही, अशी भूमिका घेतली. याविरोधात हाय कोर्टात वेदभवनतर्फे याचिका दाखल करण्यात आली. याचा निकाल वेद भवनच्या बाजूने लागला व नुकसान भरपाईची 3 कोटी 46 लाख रुपये राज्य शासनाच्या तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पालिका वेद भवनला जागेचा मोबदला देत नसल्याने संस्थेच्या वतीने विविध स्तरावर प्रयत्न केले जात होते. काही राजकीय मंडळींनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे त्यांना देखील केली होती. चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय स्तरावरील एका नेत्याने वेदभवन च्या जागेचा विषय मार्गी लावा, अशा सूचना केल्या होत्या.

वेदभवन ची ही जागा सार्वजनिक हितासाठी ताब्यात घेण्यात आल्याने त्यांना मोबदला देण्याची गरज नाही, अशा भ्रमात पालिकेचा विधी विभाग होता. त्यामुळे हायकोर्टाने दिलेल्या निकालाच्या विरोधात पालिकेने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार अर्ज दाखल केला होता.

हा अर्ज देखील फेटाळण्यात आला आहे. महापालिकेच्या विधी सल्लागार निशा चव्हाण यांनी याला दुजोरा दिला. पालिकेचा अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने पालिकेला आता वेदभवनला या जागेचा मोबदला द्यावा लागणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com