Pune River Project News : केंद्राच्या योजनेत राज्याचा खोडा; जल शुद्धीकरण प्रकल्पाला जागा देण्यास नकार...

Pune Political News : जागा गेल्या पाच वर्षापासून ताब्यात येत नसल्याने हे काम रखडले आहे...
Pune River Project :
Pune River Project :Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : शहरात तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करता यावी, यासाठी पुणे महानगरपालिकेला केंद्र सरकारने ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी’ (जायका) या संस्थेकडून कमी व्याजदराने अनुदान दिले. या प्रकल्पासाठी 990 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन प्रकल्पाच्या एकूण रकमेपैकी 85 टक्के रक्कम महापालिकेला अनुदान म्हणून दिले जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील विविध भागात 11 ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारले जाणार आहेत.

याच प्रकल्पावरुन आता हा प्रकल्प उभारताना एका जागेचा अडथळा निर्माण होत असून, ही जागा मिळण्यास राज्य सरकारचा विभागच खोडा घालत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे 'जायका'चा निधी पालिकेला मिळावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष परिश्रम घेतले होते. (Latest Marathi News)

Pune River Project :
Uddhav Thackeray Group : ठाकरे गटाने 'या' मागणीसाठी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखला अन् गडकरींकडेही केली मागणी!

शहरातील विविध भागातून वाहणाऱ्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मैलापाणी सोडले जात असल्याने नदीचे प्रदूषण वाढत चालले आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने 11 मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या प्रकल्पासाठी जागा ताब्यात घेतल्या जाणार आहेत. मात्र, यातील एक जागा गेल्या पाच वर्षापासून ताब्यात येत नसल्याने हे काम रखडले आहे. कृषी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या बोटॅनिकल गार्डनच्या जागेत हा प्रकल्प उभारला जाणार आहे. परंतु ही जागा अद्यापही महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. 2019 मध्ये ही जागा ताब्यात देण्यास मान्यता देखील देण्यात आली होती. मात्र, आता ही जागा पालिकेला देण्यास महविद्यालयाने नकार दिला आहे.

Pune River Project :
Solapur NCP : सोलापूर दौऱ्यापूर्वीच अजितदादांचा शरद पवारांना धक्का; प्रमुख नेत्यांचा राष्ट्रवादीत होणार प्रवेश

राज्य सरकारच्या 2017 च्या विकास आराखड्यात (डी पी) औंध येथील सर्व्हे नंबर 25 येथील जागा मैलापाणी शुद्धीकरण केंद्रासाठी आरक्षित दाखविण्यात आली आहे. ही 1.6 हेक्टर जागा आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव यांनी 2019 मध्ये येथे मैलापाणी शुद्धीकरण केंद्राचे काम करण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. मात्र फेब्रुवारी 2023 मध्ये कृषी विद्यापीठाने या जागेवर प्रकल्प करण्यास मनाई केली. ही जागा जैवविविधता वारसा क्षेत्र घोषित झाल्याचे कारण पुढे करून जागा देण्यास नकार देण्यात आला आहे. याबाबत पालिकेने कृषी विद्यापीठ, तसेच वन विभाग यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्याबाबत पालिका आयुक्तांनी बैठक देखील घेतली, मात्र त्यावर कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजितदादांना साकडे घालणार -

शहरात तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करता यावी यासाठी केंद्र सरकार आग्रही आहे. केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपचे नेते यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देतात. राज्यात शिंदे फडणवीस सरकार असतानाही महत्वपूर्ण असलेल्या या कामासाठी राज्यात भाजपची सत्ता असतानाही अशा पद्धतीने विरोध केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे काम तातडीने मार्गी लावावे यासाठी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा विषय मांडण्याची तयारी आता पालिकेतील अधिकाऱ्यांनी केली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com