BJP News : सलग पराभवानंतर माजी काँग्रेस आमदाराची भाजपमध्ये जाण्यासाठी धडपड; CM फडणवीसांच्या खासगी सचिवांमुळे ‘एन्ट्री’ला ब्रेक?

BJP News : चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत. मात्र श्वेता महाले यांच्याशी असलेली राजकीय स्पर्धा आणि पक्षांतर्गत समीकरणांमुळे प्रवेशाला विलंब का होतोय, याची चर्चा सुरू आहे.
Rahul Bondre’s BJP Entry
Rahul Bondre’s BJP EntrySarkarnama
Published on
Updated on

BJP News : बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. मात्र, या चर्चांना अद्याप प्रत्यक्ष प्रवेशाचा मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश नेमका का रखडला आहे, याची चर्चा आता पुन्हा जिल्ह्यात रंगली आहे.

राहुल बोंद्रे आणि विद्यमान आमदार श्वेता महाले यांच्यातील राजकीय संघर्ष काही नवा नाही. विधानसभा निवडणुकीत महाले यांनी बोंद्रे यांचा दोन वेळा पराभव केला आहे. त्यामुळे ज्या महाले यांच्याशी बोंद्रेंचा थेट राजकीय संघर्ष राहिला, आज त्याच भाजपामध्ये जाण्यासाठी राहुलभाऊंची धडपड? तगमग? की अपरिहार्यता आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी संपूर्ण जिल्ह्यासाठी राजकीय चर्चेत आहेत.

राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशासाठी काँग्रेसमधील पूर्वाश्रमीच्या काही बड्या नेत्यांकडूनही प्रयत्न झाल्याची चर्चा यापूर्वी होती. मात्र, स्थानिक राजकारणातील समीकरणे त्यांच्या मार्गात अडथळा ठरत असल्याचे बोलले जाते. कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या राहुल बोंद्रे यांना श्वेता महाले सहजासहजी आपल्या पक्षात प्रवेश देण्यास तयार होतील का, हा मोठा सवाल आहे.

Rahul Bondre’s BJP Entry
Congress Office Chair Theft Case : काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात चोरी, खुर्च्या चोरल्या; सीसीटीव्हीने बिंग फोडले

यात आणखी एक महत्त्वाचा दुवा म्हणजे श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले. विद्याधर महाले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव आहेत. त्यामुळे श्वेता महाले यांच्या राजकीय भूमिकेला आणि स्थानिक संघटनात्मक समीकरणांना फडणवीस यांच्या सत्ताकेंद्राशी जोडले जाते. परिणामी राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश फक्त स्थानिक पातळीवरील निर्णय नसून त्यामागे मोठ्या राजकीय समीकरणांचा भाग आहे का, अशी चर्चा सुरू आहे.

दुसरीकडे, राहुल बोंद्रे यांनाही भाजपमध्ये प्रवेश करून केवळ पक्षबदल करायचा आहे, असे नाही. आपल्या संस्था आणि राजकीय अस्तित्वाला बळ देण्यासोबतच पुन्हा संसदीय राजकारणात सक्रिय होण्याची त्यांची इच्छा असल्याची चर्चा आहे. म्हणजेच, राजकीय पुनर्वसनासोबत आमदारकीच्या पुनरागमनाचा मार्ग शोधण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.

Rahul Bondre’s BJP Entry
BJP Politic's : पुणे पदवीधरसाठी भाजपचा मास्टरप्लॅन; फडणवीस-चव्हाण सोलापुरात, चंद्रकांतदादांच्या नेतृत्वाखाली रणनीती!

पण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे पुढचे राजकीय स्थान काय असेल, यावरही प्रश्नचिन्ह आहे. मात्र राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश झाला तर चिखलीच्या राजकारणात समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात हे नक्की. विशेषतः श्वेता महाले आणि राहुल बोंद्रे हे एकाच पक्षात आल्यानंतर भविष्यातील नेतृत्वाची दिशा कोण ठरवणार, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com