Pune Crime News : पुणे शहरातील नाना पेठ परिसरात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
या हत्ये प्रकरणी बंडू आंदेकरसह पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे.या सर्व आरोपींना मंगळवारी न्यालयात हजर करण्यात आलं. यावेळी बंडू आंदेकरने आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातंय मी माझ्या नातवाचा खून का करू असा प्रश्न उपस्थित करत आपला या हत्येशी संबंध नसल्याचं म्हटलं.
या हत्या प्रकरणी बंडू आंदेकरसह पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे.या सर्व आरोपींना मंगळवारी न्यालयात हजर करण्यात आलं. यावेळी बंडू आंदेकरने आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातंय मी माझ्या नातवाचा खून का करू असा प्रश्न उपस्थित करत आपला या हत्येशी संबंध नसल्याचं म्हटलं.
दरम्यान, या वेळी सरकारी वकिलांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली त्याला बंडू आंदेकरच्या वकिलांनी विरोध करत ही हत्येची घटना घडली त्यावेळी बंडू आंदेकर इथे नसल्याचा युक्तीवाद केला. तर कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सहा आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.
यामध्ये बंडू आंदेकर, वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, सुजल मेरगु आणि अमन पठाण यांना 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मात्र, बंडू आंदेकर कोर्टात आपली भूमिका मांडताना आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातं असल्याचं म्हटलं. तसंच ही घटना घडली त्यावेळी आम्ही केरळमध्ये होतो.
मी माझ्या नातवाचा खून का करू? मला काय मिळणार? मारायचं असतं तर प्रतिस्पर्ध्याला मारलं असतं, असं म्हटलं आहे. तसंच यावेळी त्याने वनराजचे खूप फॉलोअर्स आहेत. तो लोकप्रिय होता. त्यापैकी कुणीतरी आयुषला मारलं असेल, असंही बंडू आंदेकरने कोर्टात म्हटलं आहे. शिवाय मी फिर्यादीच्या पतीचे, साऱ्याचे आणि नवऱ्याचे नाव घेतल्यामुळे मला या प्रकरणात मुद्दाम गोवलं आहे.
माझं संपूर्ण कुटुंब तुरूंगात जावं हाच या मागचा उद्देश आहे. कारण माझ्या मुलाच्या खून प्रकरणी मी तिच्या घरच्यांना तुरूंगात पाठवलं आहे, असंही बंडू आंदेकर कोर्टात म्हटलं आहे. तर वृंदावनी आंदेकर यांना सूर्यास्तानंतर लेडीज ऑफिसर नव्हते तरीही अटक केल्याची तक्रार आरोपींच्या वकिलाने कोर्टात केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.