Pune News: पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी 140 कोटी रूपये आले, आता तरी रस्ता होणार?

Pune Katraj Kondhwa road PMC: पुण्यातील एका कार्यक्रमात या रस्त्यासाठी २०० कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारने मंजुरी दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सांगितले होते . पण पालिकेला हा निधी मिळालेला नव्हता.
Pune Katraj Kondhwa road PMC
Pune Katraj Kondhwa road PMCSarkarnama
Published on
Updated on

Pune News: सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे चर्चेत असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याचे (Katraj Kondhwa road) रुंदीकरण काम भूसंपादांना अभावी रखडले आहे. त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी राज्य सरकारने अखेर 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा केली होती ; पण, या घोषणेला वर्ष होत आले तरी पालिकेचे (PMC) हात रिकामेच होते.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला जाग आली असून 140 कोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आले आहे. आता तरी महापालिका गांभीर्याने हा रस्ता पूर्ण करणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कात्रज येथील राजस सोसायटी ते कोंढवा येथील खडी मशिन चौक या दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामाला 31 ऑक्टोबर 2018 रोजी मान्यता मिळाली असून या भूसंपादन न झाल्याने रस्त्याचे काम रखडले आहे.

या रस्त्यांच्या भूसंपादनासाठी 710 कोटी हवे आहेत. भूसंपादनामुळे दीर्घकाळ रेंगाळलेल्या या रस्त्याची रुंदी 84 ऐवजी 50 मीटर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. रस्त्याची रुंदी कमी केल्याने भूसंपादनाचा खर्च 280 कोटी रुपये इतका येणार होता.

यापैकी 200 कोटी रुपये राज्य सरकारकडून मिळणार आहेत. हा निधी पुरवणी मागणीमध्ये मंजूर झाला होता. परंतु, वर्ष होत आला तरी हे 200 कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले नव्हते.

Pune Katraj Kondhwa road PMC
Vidhan Sabha Monsoon Session Live: पेपरफुटीवरुन विरोधक-सत्ताधारी यांच्यात खडाजंगी; अधिवेशनात कायदा आणणार का?

दरम्यान रस्ता तुकड्या तुकड्यात कात्रज-कोंढवा रस्ताचे काही प्रमाणात टीडीआर देऊन भूसंपादन झाले आहे. त्यामुळे हा रस्ता तुकड्या तुकड्यामध्ये तयार आहे. रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपादनाअभावी रस्त्याचे काम रखडले आहे.

टीडीआरचे दर कमी झाल्यामुळे जागा मालकांकडून भूसंपादनसाठी रोख रकमेची मागणी केली जात आहे. त्यामुळे या रस्त्याच्या भूसंपादनासाठी 200 कोटींच्या निधीची गरज होती.

वर्षा पूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात या रस्त्यासाठी २०० कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारने मंजुरी दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सांगितले होते . पण पालिकेला हा निधी मिळालेला नव्हता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील निधी देण्याचा आश्वासन दिलं होतं.

त्यानंतर अजित पवार यांनी अचानक कात्रज कोंढवा रस्त्याला भेट दिली आणि रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याचे प्रशासनाला आदेश दिले. तसेच 200 कोटी कॅबिनेट पुढच्या आठवड्यात देईल असा शब्द दिला. त्या आश्वासनाला देखील बराच काळ उलटून गेला. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला जाग आली आहे. राज्य सरकारने तातडीने हे 140 कोटी पालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत.

Pune Katraj Kondhwa road PMC
Gautam Kakade: बारामतीतील निंबाळकर खून प्रकरणी फरार आरोपी गौतम काकडे याला अटक

आतापर्यंत महापालिका भूसंपादनासाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत हा रस्ता रखडला असल्याचे सांगत होती. आता महापालिकेला निधी जमा झाला आहे.त्यामुळे आता महापालिका प्रशासन युद्ध पातळीवर या रस्त्याचे भूसंपादन करून रस्त्याचे काम पूर्ण करणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

माजी आमदार भाजप नेते योगेश टिळेकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले, सरकारकडून कात्रज कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठीचा निधीला मंजुरी मिळाली होती. मात्र यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याने हा निधी रखडला होता.

लोकसभा निवडणुकीनंतर सातत्याने पाठपुरावा करून हा निधी आम्ही मंजूर करून आणला आहे. आज सकाळी महापालिकेच्या तिजोरीत 140 कोटी जमा झाले आहे. यामुळे कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाला गती मिळणार असल्याचं टिळेकर यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com