BJP Nagpur: नागपूरमध्ये भाजपने दिला कट्टर हिंदुत्ववादी अध्यक्ष

BJP Appoints 58 district presidents in Maharashtra Dayashankar Tiwari Nagpur president:दयाशंकर तिवारी हे नागपूर शहराचे ज्येष्ठ महापौर होते, नागपूर महापालिका स्थायी समितीचे सभापती होते. या पूर्वी त्यांना मध्य नागपूर विधान सभेचे तिकीट देण्यात आले होते.
Dayashankar Tiwari Nagpur BJP president
Dayashankar Tiwari Nagpur BJP presidentSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : भाजपने नागपूर जिल्ह्यात भाकरी फिरवली आहे. नागपूर शहराचे अध्यक्ष बंटी कुकडे यांचा सुमारे एक वर्षाचा कार्यकाळ बाकी असताना शहराचे माजी महापौर आणि कट्टर हिंदुत्ववादी दयाशंकर तिवारी यांची अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. एक आक्रमक, कडवा हिंदुत्ववादी आणि परिपक्व अध्यक्ष भाजपने निवडला आहे.

दयाशंकर तिवारी हे नागपूर शहराचे ज्येष्ठ महापौर होते, नागपूर महापालिका स्थायी समितीचे सभापती होते. या पूर्वी त्यांना मध्य नागपूर विधान सभेचे तिकीट देण्यात आले होते. माजी मंत्री अनिस अहमद यांना कडवा मुकाबला त्यांनी दिला होता. हिंदू विरुद्ध मुस्लिम असचा रंग या निवडणुकीला देण्यात आला होता. मात्र भाजपचे प्रयत्न त्यावेळी फसले होते. नंतर विकास कुंभारे आणि आता प्रवीण दटके यांनी या मुस्लिम बहुल मतदार संघावर भगवा फडकवला.

Dayashankar Tiwari Nagpur BJP president
अभिनेते बनले 'पॉलिटिकल हिरो'

जातीय आणि धार्मिक समीकरणात मध्य नागपूर मधून निवडून येण्याची शक्यता नसल्याने तिवारी यांनी आपला मोर्चा पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघाकडे वळवला होता. त्यांचे नाव आघाडीवर होते. एक जागा हिंदी भाषिकांना देण्यात यावी अशी मोर्चे बांधणी केली होती.

अनेक दावेदार असताना भाजपने माजी आमदार आणि ग्रामीणचे अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी वेळेवर येथे लढण्यास पाठवले. त्यामुळे अनेकजण नाराज होते. यात तिवारी यांचाही समावेश होता. शहराचे अध्यक्ष करून भाजपने ती दूर केल्याचे दिसून येते. सोबतच जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये मिलाफ साधला आहे.

Dayashankar Tiwari Nagpur BJP president
Jammu Kashmir Encounter : शोपियामध्ये दहशतवाद्यांना घेरलं! तीन दहशतवादी ठार; जंगलात गोळीबार सुरु

भाजपने यावेळी अध्यक्ष करताना वय आणि आजी माजी आमदार नको असे काही निकष ठरवले होते. यात दयाशंकर तिवारी फिट बसतात. हिंदुत्ववादी दयाशंकर तिवारी यांना शहराध्यक्ष करून भाजपने यापुढे हिंदुत्वाचा अजेंडा उघडपणे राबवण्याचे संकेत दिले असल्याची चर्चा आहे. सोबतच हिंदी भाषिक दुखवणार नाही याचीही काळजी घेतल्याचे दिसते.

कोकण, पश्चिम महराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईत अशा प्रदेशात राज्यातील 36 जिल्ह्यात एकूण 58 जिल्हाध्यक्षांची निवड भाजपने जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात ही प्रक्रिया पार पडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com