Ramdas Athawale News: शिंदे-फडणवीसांकडे 'रिपाइं' केली ही मागणी; आगामी निवडणुकीत योग्य वाटा..

Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकार दमदार आहे.
Ramdas Athawale
Ramdas Athawale Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर मित्र पक्षांची मुंबईत नुकतीच बैठक झाली आहे. या बैठकीत आगामी मंत्रिमंडळ विस्तारात 'रिपाइं'ला एक मंत्रिपद देण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (ता.२९) पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.

पाटण्यात विरोधकांची बैठक नुकतीच झाली. याबाबत रामदास आठवले म्हणाले, "देशातील विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एकवटले आहेत. मात्र, त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. शिवाय मराठा आरक्षणाला ‘रिपाइं’चा विरोध नाही. मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना स्वतंत्र आरक्षण त्यांना द्यावे, असे आमचे म्हणणे आहे.’’

Ramdas Athawale
BMC Control Room News: 'त्या' एका कॉलमुळे मुंबई हादरली; BMC कंट्रोल रुमला फोन.., दोन दहशतवादी

महाराष्ट्रात गुलाबी रंग चालणार नाही..

तेलंगणातील भारत राष्ट्र समिती पक्षानं महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. याविषयी रामदास आठवले म्हणाले, "राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार दमदार आहे. महाराष्ट्रात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) यांचा गुलाबी रंग चालणार नाही,"

आगामी विधानसभा निवडणुकीविषयी ते म्हणाले, "जागा वाटपात विधान परिषदेची एक आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकीत ‘रिपाइं’ला योग्य वाटा मागितला आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षण रोटेशन पद्धतीने होत आहे. मात्र, या रोटेशन पद्धतीमुळे दलित वस्ती नसलेल्या गावांमध्ये मागासवर्गीय व्यक्ती निवडून येत नाही. यासाठी आरक्षण निश्‍चितीची रोटेशन बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे,"

Ramdas Athawale
Sharad Pawar on uniform civil code : समान नागरी कायदाच्या समर्थनावर पवार म्हणाले, "सर्व समुदायांची भूमिका समजून घेतल्यानंतर...

नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची..

उत्तर प्रदेशमध्ये भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला झाला. या हल्लाचा आठवले यांनी यावेळी तीव्र शब्दात निषेध केला. "विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. राजकीय नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे सरकारने याची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करायला हवी," असे आठवले म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com