Chandrashekhar Bawankule : "माझा मुलगा...." लेकाच्या 'ऑडी'कार प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बावनकुळेंनी मानले गणरायाचे आभार

Chandrashekhar Bawankule On Nagpur Hit and Run Case : "माझा मुलगा असो किंवा, सामान्य मुलगा असो नियमाने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. जे नियम सर्वांसाठी आहेत तेच सर्व नियम या घटनेत लावले जातील. मी चौकशीमध्ये काही जास्त बोललो तर पोलिसांवर दडपण आल्यासारखं होईल."
Chandrashekhar Bawankule On  Nagpur Hit and Run Case
Chandrashekhar Bawankule On Nagpur Hit and Run CaseSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 10 Sep : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेच्या (Sanket Bawankule) ऑडी कारने रविवारी मध्यरात्री नागपुरात दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिली. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

विरोधकांनी या प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. तर, या घटनेची चौकशी होईल. मात्र विरोधकांकडून या घटनेचे राजकारण केले जात असून मुद्दाम बावनकुळे यांना बदनाम केले जात असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

अशातच आता पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या बावनकुळे यांनी लेकाच्या 'ऑडी'कार प्रकरावर प्रतिक्रिया देताना गणरायाचे आभार मानले आहेत. पुण्यातील गणपती मंडळांना भेटी दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधकाना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, "नागपूरमधील घटना ही पूर्ण चौकशीचा भाग आहे.

माझा मुलगा असो किंवा, सामान्य मुलगा असो नियमाने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. जे नियम सर्वांसाठी आहेत तेच सर्व नियम या घटनेत लावले जातील. मी चौकशीमध्ये काही जास्त बोललो तर पोलिसांवर दडपण आल्यासारखं होईल. मात्र, या घटनेत कोणी जखमी नाही, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यासाठी मी गणरायाचे आभार मानतो."

Chandrashekhar Bawankule On  Nagpur Hit and Run Case
Nagpur Hit and Run Case : नागपूर 'ऑडी'कारनामा; बावनकुळेंच्या मुलावर गंभीर आरोप; गृहमंत्री फडणवीसांचं मोठं विधान

तसंच, महाराष्ट्राची सामाजिक संस्कृती मजबूत राहावी म्हणून सगळ्यांनी एकत्र यायला हवं. परमेश्वराचे बळ आपण घेतलं पाहिजे. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणं हेच परमेश्वराची इच्छा आहे, असंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी केंद्रातील एनडीए सरकार पुढील पाच वर्ष सत्तेत राहिल असा दावा केला. शिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना सुरू राहतील. मात्र, महाविकास आघाडीचे (Mahavika Aghadi) सरकार आलं तर सगळ्या योजना बंद पडतील, असं म्हणत त्यांनी कर्नाटक आणि तेलंगणामधील बंद पडलेल्या योजनांचं उदाहरण दिलं.

बहिणी आता महायुतीलाच मत देणार

लाडकी बहीण योजना त्यांना ही माहिती आहे की ही योजना खंबीरपणे उभी राहिली आहे. कुठल्या ही बहिणीला विचारा, बहीण पण आता महायुतीला मत देणार असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला. तसंच भाजपचे संघटन अजित पवारांना पूर्णपणे पाठिंबा देईल त्यांना ताकद देईल शिवाय भाजपचा कार्यकर्ता अजित पवारांच्या पाठीमागे उभा राहील, असंही त्यांनी सांगितलं.

Chandrashekhar Bawankule On  Nagpur Hit and Run Case
Ajit Pawar : मोठी बातमी! मला मुख्यमंत्री करा, अजितदादांची अमित शहांकडे मागणी?

सगळ्यांना संधी मिळेल

2019 मध्ये माझं तिकीट कमी केलं तरी मी पक्षात थांबलो, थोडा संयम थोडी सबुरी पाहिजे. माझं आवाहान आहे की, थोडं थांबा सगळ्यांना संधी मिळेल, असा सल्ला त्यांनी भाजपमधून बाहेर जाण्याचा विचार करत असलेल्या नेत्यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com