Ajit Pawar : मोठी बातमी! मला मुख्यमंत्री करा, अजितदादांची अमित शहांकडे मागणी?

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा निवडणुकीनंतर या पदावर ती कायम राहण्याचे स्वप्न पाहत आहेत.
Amit Shah| Ajit Pawar
Amit Shah| Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

विधानसभा निवडणुकीत महायुतीतील तीन पक्षांत मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यापुढे मोठा प्रस्ताव ठेवला आहे. "निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री म्हणून घोषित करा, महाराष्ट्रात 'बिहार पॅटर्न' राबवा," अशा मागणीचा प्रस्ताव अजितदादांनी गृहमंत्री शाह यांच्यासमोर ठेवला आहे. याबाबत 'द हिंदू'नं सूत्रांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) रविवार आणि सोमवार असे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. मुंबई दौऱ्याचा समारोप करून दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शाह यांनी मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

यावेळी अजितदादा आणि गृहमंत्री शाह यांच्यात बैठक झाली. तेव्हा "निवडणुकीनंतर आपल्याला मुख्यमंत्री करा. त्यासाठी महाराष्ट्रात 'बिहार पॅटर्न' राबवा," असा प्रस्ताव अजितदादांनी गृहमंत्री शाह यांच्यापुढे ठेवला आहे.

Amit Shah| Ajit Pawar
Video BJP Politics : महायुतीचा फाॅर्म्युला ठरला! भाजपला 160 तर अजितदादा, एकनाथ शिंदेंना फक्त 64 जागा?

एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असं सातत्यानं बोललं जात आहे. दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाची हुकलेली संधी पुन्हा मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयारी करत आहेत. यातच अजितदादांच्या मागणीमुळे राजकीय उलाथपालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार?

विधानसभेला सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप 150 ते 160 जागा लढवू इच्छितो आहे. तर, अजितदादांची राष्ट्रवादी 70 जागा लढविण्यावर ठाम आहे. दुसरीकडे, शिंदे गटाकडून 80 जागांवर दावा करण्यात येत आहे. तीनही पक्षांकडून वेगवेगळे दावे सांगण्यात येत असल्यानं महायुतीत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Amit Shah| Ajit Pawar
Sanjay Raut Vs Amit Shah : संजय राऊत अमित शाह यांच्यावर संतापले; म्हणाले, 'आम्ही काय गोट्या खेळत होतो का?'

मात्र, सोमवारी झालेल्या बैठकीत राज्य भाजपच्या ( Bjp ) नेतृत्त्वानं गृहमंत्री शाह यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला आहे. त्यात 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी, असं राज्य भाजपच्या नेतृत्त्वानं म्हटलं आहे. भाजपनेच गृहमंत्री शाह यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवल्यानं महायुतीतील तीन पक्षांत मैत्रीपूर्ण लढत होणार का? गृहमंत्री शाह या प्रस्तावाला मान्यता देतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com