Budhwar Peth Pune :बुधवार पेठेत 12 वाजता नाकाबंदी 683 पोलीस अन हाताला लागले 700 जण.. ऑपरेशन बाबत पोलीस अधिकाऱ्यांनी दिली धक्कादायक माहिती

Pune Police Combing Operation : पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन राबवून 41 इमारतींची तपासणी केली. 700 जणांची झडती, 2 बांग्लादेशी महिला, अमली पदार्थ जप्त; पुढील तपास सुरू आहे
Pune Police officials conduct a large-scale midnight combing operation in Budhwar Peth, inspecting buildings and questioning residents during a major crackdown.
Pune Police officials conduct a large-scale midnight combing operation in Budhwar Peth, inspecting buildings and questioning residents during a major crackdown.Sarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News : पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत रात्रीच्या वेळी मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. ऑपरेशनच्या माध्यमातून बुधवार पेठ परिसरात राहणारे बेकायदा बांग्लादेशी नागरिक, अमली पदार्थांची तस्करी आणि अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे थांबवणे हा होता, पण ऑपरेशनदरम्यान पोलिसांच्या तावडीत तब्बल 700 जण सापडले असल्याचे समोर आले आहे.

मागील आठवड्यात देखील पोलिसांनी बुधवार पेठेतील डिस्को बिल्डिंग वर छाप टाकत 10 बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे बुधवार पेठ भागामध्ये त्यांचा मोठा वास्तव्य असल्याचे समोर आलं होतं. त्यानंतर ही मोठी कारवाई पोलिसांकडून करण्यात आली आहे. याबाबत पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी माहिती दिली आहे.

याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना शर्मा म्हणाले, काल रात्री पुण्यातील बुधवार पेठेत पुणे पोलिसांनी मोठं कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं होत. काही दिवसांपासून या भागामध्ये बांगलादेशींच्या वास्तव्या बाबत माहिती मिळत होती. तसंच एका अल्पवयीन तरुणीने याबाबत पोलिसांकडे तक्रारी दिली होती. त्यानंतर मंगळवारी (ता.10) बुधवार पेठ मध्ये ही कारवाई करण्यात आली.

Pune Police officials conduct a large-scale midnight combing operation in Budhwar Peth, inspecting buildings and questioning residents during a major crackdown.
Pune Crime News : भाजप उमेदवाराच्या मुलाचा कारनामा; मद्य वाहतूक करताना पकडले,कार जप्त!

या ऑपरेशन मध्ये 3 डीसीपी दर्जाचे अधिकारी, 8 एसीपी दर्जाच्या अधिकारी, 22 सिनियर पीआय दर्जाचे अधिकारी आणि इतर 55 पोलीस अधिकारी तसेच 600 पेक्षा अधिक अंमलदार यांचा सहभागी होते. मध्यरात्री 12 वाजता सुरू झालेलं या कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये बुधवार पेठेतील 41 बिल्डिंग तपासल्या गेल्या तसेच 700 लोकांची झडती घेऊन त्यांना समज देखील देण्यात आली असून त्यांच्यावरील पुढील कारवाई सुरू आहे.

Pune Police officials conduct a large-scale midnight combing operation in Budhwar Peth, inspecting buildings and questioning residents during a major crackdown.
Pune Police : बुधवार पेठेत बांग्लादेशी नागरिकांच्या शोधासाठी छापा अन्..., पोलिसांच्या जाळ्यात सापडले वेगळंच सावज

या कारवाई दरम्यान पोलिसांना 2 बांगलादेशी महिला सापडल्या असून काही अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात यश आलं आहे. तसेच झडती दरम्यान काही जणांकडे 7 ग्राम चरस तसेच अमली पदार्थांचे इंजेक्शन मिळून अली. त्या व्यक्तीकडे हे इंजेक्शन आढळून आले आहेत. तो व्यक्ती लातूर येथील आहे.हे अमली पदार्थ आणि इंजेक्शन नेमकं कुठून आणले गेले होते याचे पेडलर कोण आहेत. याचा तपास पोलिसांकडून सुरू असून याबाबत फरासखाना पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com