Pune Police : बुधवार पेठेत बांग्लादेशी नागरिकांच्या शोधासाठी छापा अन्..., पोलिसांच्या जाळ्यात सापडले वेगळंच सावज

Pune Police Raid Budhwar Peth : यापूर्वी पोलिसांनी बुधवार पेठेतील डिस्को बिल्डिंगवर छाप टाकत 10 बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं होतं.
Pune Police officials during a raid in Budhwar Peth searching for suspected Bangladeshi nationals.
Pune Police officials during a raid in Budhwar Peth searching for suspected Bangladeshi nationals.sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत रात्रीच्या वेळी मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. मुख्य उद्देश बेकायदा बांग्लादेशी नागरिक, अमली पदार्थांचा तस्करी आणि अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे थांबवणे हा होता, पण ऑपरेशनदरम्यान पोलिसांच्या तावडीत अनेक ग्राहक म्हणून आलेले तरुण सापडले.

बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये एका बांग्लादेशी तरुणीचा बेकायदा वास्तव्याचा प्रकार समोर आल्यानंतर हि माहिती लपवल्याचा आरोप फरासखाना पोलिस ठाण्यातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यावर करण्यात आला आहे. या तरुणीबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली नाही आणि माहिती लपवण्यासाठी कथितरित्या पैसे घेतल्याचा आरोप असल्याने या पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते.

त्यापूर्वी देखील पोलिसांनी बुधवार पेठेतील डिस्को बिल्डिंगवर छाप टाकत 10 बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे बुधवार पेठ भागामध्ये त्यांचा मोठा वास्तव्य असल्याचे समोर आलं होतं. या घटनेनंतर पुणे पोलिस दलाने तात्काळ कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

बुधवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ३ वाजेपर्यंत बुधवार पेठेत व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध युनिट्सचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल झाले. कंपनी या कारवाईत 150 जणांचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.

ऑपरेशन अंतर्गत बुधवार पेठेतील प्रत्येक गल्लीबाहेर कडेकोट नाकाबंदी लावण्यात आली. ५० पेक्षा अधिक घरांची आणि कुंटणखान्यांची झडती घेण्यात आली. शुक्रवार पेठ पोलिस चौकीजवळील कुंटणखान्यांमधील महिलांची महिला पोलिसांनी चौकशी केली. वेश्यावस्तीत वावरत असलेल्या अनेक तरुणांची झडती घेऊन त्यांची ओळख परेड घेण्यात आले.

Pune Police officials during a raid in Budhwar Peth searching for suspected Bangladeshi nationals.
Congress Vs BJP : 'अशोक चव्हाण खुर्चीत, नगराध्यक्ष उभे...'; काँग्रेस प्रवक्त्याने 'चव्हाण', 'देशमुख' पॅटर्नमधील फरक सांगितला

'त्या' तरुणांना रस्त्यावर बसवले...

पोलिसांनी अमली पदार्थ, जबरदस्तीने वेश्याव्यवसाय, अल्पवयीन मुलींचा गैरफायदा आणि बांग्लादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य याबाबत संशयितांची चौकशी केली. मुख्य हेतू बांग्लादेशी महिलांचा शोध घेणे असला तरी, बांग्लादेशी नागरिक पोलिसांच्या हाती लागले नाहीत मात्र अनेक तरुण ग्राहक म्हणून या ठिकाणी आलेले आढळले. पोलिसांनी त्यांना रस्त्याच्या कडेला बसवून नाव, पत्ता आणि इतर प्राथमिक माहिती नोंदवली. या तरुणांची चांगलीच शाळा पोलिसांनी घेतली असल्याचे समोर आले आहे.

Pune Police officials during a raid in Budhwar Peth searching for suspected Bangladeshi nationals.
Maharashtra Govt News: महाराष्ट्र ठरलं देशातलं पहिलं राज्य! शेतकऱ्यांबाबत घेतला मोठा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com