Threat to CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणारा पुणे पोलिसांच्या ताब्यात !

Threat to the Chief Minister : दारूच्या नशेत धमकी दिल्याची शक्यता...
Threat to CM Eknath Shinde :
Threat to CM Eknath Shinde : Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल आल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातल्या वारजे परिसरातून हा फोन आल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून असे धमकीचे कॉल अनेक राजकीय नेत्यांना आले होते. मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याप्रकरणी आता एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

Threat to CM Eknath Shinde :
Thackeray-Shinde Politics: तर एकनाथ शिंदे राजीनामा देणार का? संजय राऊतांचा सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धमकी प्रकरणी संशयिताला घेतलं पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात घेण्यात आले आहे. या व्यक्तिने दारूच्या नशेत धमकिचा कॉल केल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पोलिस याची आता चौकशी करत आहेत.

या धमकीच्या कॉल मध्ये धमकी देणाऱ्या कॉलरने सांगितले आहे की, मी मुख्यमंत्र्यांना उडवणार. सोमवारी सायंकाळी हा कॉल आला होता. कॉलरने ११२ या नंबरवर कॉल केला होता. नागपूरच्या कंट्रोल रूममध्ये हा कॉल केला. यानंतर आता या धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. (Latest Maharashtra News)

Threat to CM Eknath Shinde :
CM Eknath Shinde Death Threat: 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उडवणार..' ; कंट्रोल रूमवर धमकीचा फोन, एकच खळबळ..

यापूर्वीही मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याच्या अनेकदा धमक्या आल्या आहेत. मात्र हा कॉल नागपूरमध्ये कंट्रोल रूमवर आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस याबाबत तातडीने तपास सुरू केल्यानंतर, आरोपील ताब्यात घेतल्याचे समजते. (Political Breaking News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com