Sanjay Raut : महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे सेनेला धक्का बसणार; राऊतांच्या बैठकीला माजी नगरसेवकांची दांडी

Pune Municipal Corporation PMC Election MP Sanjay Raut: एकीकडे महापालिका निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी खासदार संजय राऊत हे पुण्यामध्ये बैठकीसाठी आले असताना या बैठकीला मात्र पुण्यातील सर्वच्या सर्व ठाकरे सेनेच्या माजी नगरसेवकांनी दांडी मारली असल्याचं पाहायला मिळालं.
PMC
PMC Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड अशी मुसंडी मारल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. या पराभवातून सावरत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.

एकीकडे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर ठाकरे सेनेचे शिलेदार पालिका निवडणुकी बाबत काहीसे संभ्रम अवस्थेत असल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना ठाकरे गटाला धक्के बसण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. पुढील काही महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकांबाबत चाचपणी करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून देखील आज पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची चाचपणी करण्यात आली. शहरातील पदाधिकाऱ्यांशी खासदार संजय राऊत यांनी बैठक घेत महापालिका निवडणुकीत बाबत आढावा घेतला.

PMC
Maharashtra Breaking News Live Updates : आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही - अजित पवार

आगामी निवडणुकीला सामोरे जाताना स्थानिक पदाधिकाऱ्यांची भूमिका या बैठकीच्या माध्यमातून जाणून घेण्यात येत आहे. मुंबईमधील स्थानिक पदाधिकारी हे स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा विचार केल्यास या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढाव्यात असा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. सर्व गोष्टींबाबत खासदार संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांची चर्चा केली.

एकीकडे महापालिका निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी खासदार संजय राऊत हे पुण्यामध्ये बैठकीसाठी आले असताना या बैठकीला मात्र पुण्यातील सर्वच्या सर्व ठाकरे सेनेच्या माजी नगरसेवकांनी दांडी मारली असल्याचं पाहायला मिळालं.

PMC
Jitendra Awhad: फडणवीसांची 'मनोरूग्ण नवी टेक्नीक'; आव्हाडांना नेमकं काय म्हणायचंय!

मागील महापालिका निवडणुकीत सेनेने दहा ठिकाणी विजय मिळवला होता. शिवसेनेच्या फुटीनंतर देखील फक्त एक नगरसेवक हा शिंदे सोबत गेला तर लोकसभा निवडणुकी वेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक असलेल्या अविनाश साळवे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सद्य परिस्थितीला आठ माजी नगरसेवक हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबत आहेत .

यापैकी एकही नगरसेवकाने संजय राऊत यांच्या बैठकीला उपस्थिती न लावल्याने सर्वांच्याच भुया उंचावल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या काळात हे नगरसेवक वेगळा विचार करण्याच्या मनस्थितीत आहे का अशा चर्चांना उधाण आला आहे. या बैठकीबाबत आदल्या दिवशी सायंकाळी अचानक निरोप मिळाल्याने आणि शनिवारचा प्रोग्रॅम आधीच फिक्स झाल्याने बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही, असं काही नगरसेवकांनी सरकारनामाशी बोलताना सांगितला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com