Maharashtra Floods : भाजी विक्रेत्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 'लाख'मोलाची मदत

Pune vegetable vendor donates ₹1 lakh to flood-affected farmers:. कसबा मतदारसंघातील भाजी विक्रेते चरण वणवे यांनी दाखवलेलं माणुसकीचं उदाहरण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Pune vegetable vendor donates ₹1 lakh to flood-affected farmers
Pune vegetable vendor donates ₹1 lakh to flood-affected farmersSarkarnama
Published on
Updated on

Pune News: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोलापूरसह मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास असमानी संकटाने हिरावून घेतले आहे.

शेतकऱ्यांच्या मदत करण्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख नेते मंडळी आणि मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले असले तरी झालेलं नुकसान पूर्णपणे भरून येणे शक्य नाही. त्यामुळे सर्व स्तरातून शेतकऱ्यांसाठी मदतीचे हात पुढे येताना पाहायला मिळत आहेत. अशाच एका पुण्यातील भाजी विक्रेत्याने आपलं दातृत्व दाखवत शेतकऱ्यांची मदत केली आहे.

सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक भागामध्ये आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. या कठीण परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकाने मदतीचा हात पुढे करणे ही खरी सामाजिक जबाबदारी आहे. कसबा मतदारसंघातील भाजी विक्रेते चरण वणवे यांनी दाखवलेलं माणुसकीचं उदाहरण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

रस्त्यावर बसून भाजी विकणारे चरण वणवे यांनी पूरग्रस्तांसाठी तब्बल १ लाख १३ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सपूर्त केला. यावेळी कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासनेही उपस्थित होते. हा निधी वणवे यांनी आपल्या घरात असणाऱ्या सद्गुरू शंकर महाराजांच्या पादुकांपुढील संकल्प पेटीतून उभा केला आहे.


Pune vegetable vendor donates ₹1 lakh to flood-affected farmers
Rahul Gandhi: आधी फोनवरून सांत्वन, आता थेट महाराष्ट्रात येऊन सन्मान : भाजपने साडी नेसवलेल्या नेत्याच्या मागे राहुल गांधी पहाडासारखे उभे

गेल्या अनेक वर्षांपासून ते या पेटीत दररोज १०० रुपये जमा करत आहेत. याच गल्ल्यातून कोविड काळातही त्यांनी मोठी मदत केली होती. वनवे म्हणाले, "आमची तिसरी पिढी भाजी विक्रीचा व्यवसाय करते. माझ्या आईने कोरोनाच्या काळात गरजवंतांना एक लाख रुपयांची मदत केली होती. आपल्याकडील पैसा हा इतरांच्या कामाला यावा अन्यथा तो दुःखाचा डोंगर आहे, अशी आईची शिकवण होती.

तिच्या पश्चात मी हा वारसा पुढे नेत असून नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने दररोज शंभर रुपये बाजूला ठेवत आलो आहे. आज समाजाची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार मी खारीचा वाटा उचलला आहे."

'अत्यंत गरीब परिस्थितीतही आपण समाजाचे काही देणे लागतो या नात्याने वनवे यांनी केलेली मदत लाख मोलाची आणि समाजाला प्रेरित करणारी आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने कसबा मतदार संघातील अभियानाचा आम्ही आज यानिमित्ताने प्रारंभ केला. अधिकाधिक नागरिकांनी पूरग्रस्तांना मदत करावी," असे आवाहन आमदार रासने यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com