Assembly Election : पुण्यातील 'या' दोन मतदारसंघावर शिवसेनेचा दावा ; शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरुन संघर्ष...

BJP Vs Shivsena Assembly Election : भाजपसाठी खडकवासल्याच्या जागेचे महत्व अधिक आहे.
BJP Vs Shivsena Assembly Election
BJP Vs Shivsena Assembly ElectionSarkarnma
Published on
Updated on

Hadapsar, Khadakwasla constituency news : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दीड वर्षांचा कालावधी आहे. महाविकास आघाडी आणि युतीतील मित्रपक्षांनी मतदार संघांवर दावा करण्यास सुरवात केली आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाकडून हडपसर आणि खडकवासला मतदार संघावर दावा करण्यात आला आहे. युतीतील या दोन्ही जागा सध्या भाजपकडे आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदार संघामध्ये भाजपचे योगेश टिळेकर यांच्या पराभव झाला आहे, तर याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे विजयी झाले होते.

खडकवासला मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे. भाजपचे भीमराव तापकीर हे या मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत. बारामती मतदारसंघातील महत्वाचा भाग म्हणून ही भाजपसाठी खडकवासल्याच्या जागेचे महत्व अधिक आहे.

शिंदे गटाचे शहराध्यक्ष प्रमोद भानगीरे यांनी हडपसर आणि खडकवासला दोन जागांवर दावा केला आहे. भानगिरे यांच्या या दाव्यामुळे भाजप-शिवसेना यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

BJP Vs Shivsena Assembly Election
Assembly Election 2023 : दोन राज्यातील विजयानंतर निवडणुकीची जबाबदारी आता प्रियंका गांधींच्या खांद्यावर ; महिलांसाठी विशेष..

राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद हडपसर आणि खडकवासला या विधानसभा मतदार संघांमध्ये आहे. मात्र, हे दोन्ही मतदार संघ पुणे लोकसभा मतदार संघात येत नाहीत. हडपसर मतदार संघ हा शिरुर लोकसभा मतदार संघात, तर खडकवासला मतदार संघ हा बारामती लोकसभा मतदार संघात येतो. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे कार्यक्षेत्र हे हडपसर मतदार संघात आहे.

BJP Vs Shivsena Assembly Election
Manipur Violence News : डबल इंजिनचं सरकार, तरीही मणिपूर अशांतच ; ठाकरे गटाचा मोदींवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभा मतदार संघावर दावा केल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने मावळ लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे.

मावळमधून तीनवेळा राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. त्यामुळे मावळ मतदारसंघ काँग्रेसला सोडावा अशी मागणी शहर पदाधिकाऱ्यांनी प्रदेश नेतृत्वाकडे केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा अवधी असताना महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com