

Pune News : पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती पदांसाठी आज निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी अनेक नवनवीन समीकरणे जुळवली असल्याचे पाहायला मिळत आहे. तरीदेखील बहुतांश ठिकाणी समसमान उमेदवार असल्याने चिठ्ठ्यांवर सभापती निश्चित होणार आहे.
आज सभापतीची निवड होणार असल्याने अखेरच्या क्षणी आपली वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांची खलबते सुरू असून स्थानिक पातळीवर तालुक्यातच निर्णय होणार असल्याने या निवडणुकांसाठी स्थानिक नेत्यांचे महत्त्वदेखील वाढले आहे. विशेषतः मुळशी, जुन्नर आणि भोर तालुक्यांत सभापतिपदासाठी चुरस आहे.
पुणे जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहिल्यास आठ पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे यामध्ये मावळ (१०), बारामती (१०), इंदापूर (१६), राजगड (३), आंबेगाव (८), शिरूर (८), पुरंदर (४), हवेली (६) तर, भाजप एक पंचायत समिती दौंड- (८), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पंचायत समिती, खेड (९) या पंचायत समितीचा समावेश आहे. या ठिकाणी स्पष्ट बहुमत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचाच सभापती आणि उपसभापती होतील.
जुन्नरमध्ये शिंदेंची शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांच्याकडे स्पष्ट असं बहुमत नाही त्यामुळे या ठिकाणी युती आघाडीचे पर्याय चाचपले जात आहेत. जुन्नर मध्ये भाजपचा एक, राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, शिवसेना आठ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा एक असे एकूण १६ सदस्य आहेत.
भोर पंचायत समितीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी चार सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे सभापती निवडीवेळी एका मतालाही मोठे महत्त्व आहे. मुळशीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, भाजपचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन सदस्य विजयी झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी चिठ्ठ्यांवरती सभापती उपसभापती ठरण्याची शक्यता आहे. तर पुरंदर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य विजयी झाले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने या ठिकाणी बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.