Pune Accident News: पुण्यात कुंडेश्वर दर्शनाला जाणारी पिकअप पलटली; 9 महिलांचा मृत्यू, 20 भाविक गंभीर जखमी

Khed Pickup Accident : खेड तालुक्यातील कुंडेश्वर शिव मंदिराकडे दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांच्या पिकअप जीपला भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत 9 महिलांचा मृत्यू झाला, तर 25 ते 30 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
Pune Accident  (1).jpg
Pune Accident (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : खेड तालुक्यातील कुंडेश्वर शिव मंदिराकडे दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांच्या पिकअप जीपला भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत 9 महिलांचा मृत्यू झाला, तर 25 ते 30 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघाताला काही गोष्टी कारणीभूत ठरल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पुणे (Pune) जिल्ह्यामधील खेड तालुक्यात ही अपघाताची घटना सोमवारी (ता.11 ऑगस्ट) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील नागमोडी घाट परिसरात घडली. पापळवाडी येथील महिला भाविक कुंडेश्वर येथील शिव मंदिराकडे दर्शनासाठी जात होत्या. घाटातील तीव्र वळणावर गाडीचा चालकाचा ताबा सुटला आणि पिकअप जीप 5 ते 6 पलट्या खात रस्त्याच्या कडेला दरीत कोसळली.

या अपघातात (Accident) सात महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर 25 ते 30 महिला प्रवासी जखमी झाल्या. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने पाईट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताचे कारण:

प्राथमिक माहितीनुसार, पिकअप जीप क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांनी भरलेली होती. रस्ता ही खराब होता आणि घाटातील तीव्र वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रिटर्न होऊन दरीत पलटली. या अपघाताला रस्त्याची खराब अवस्था आणि वाहनाची जास्त क्षमता हे कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

Pune Accident  (1).jpg
Eknath Shinde News: 'स्थानिक'च्या निवडणुकीपूर्वी खान्देशातील राजकारण फिरलं; माजी आमदाराचा एकनाथ शिंदेंबाबत मोठा निर्णय

खेड पोलीस स्टेशनकडून या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे. अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com