Shivsena
ShivsenaSarkarnama

Shivsena News : ठाण्यात 'बॅनरवॉर' मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात तोफ धडाडण्याआधीच शिंदे गटानं ठाकरेंना ललकारलं

Shivsena Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : घालीन लोटांगण वंदीन चरण" अशा आशयाचे बॅनर्स ठाण्यात लावण्यात आले असून या बॅनवर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यासमोर उद्धव ठाकरेंनी गुडघे टेकल्याचे व्यंगचित्राच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे.
Published on

Mumbai News, 10 August : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाल्लेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या ठाण्यात शनिवारी (ता.10 ऑगस्ट) रोजी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वीच आता ठाण्यात लागलेल्या 'बॅनर्स'वरुन ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

"घालीन लोटांगण वंदीन चरण" अशा आशयाचे बॅनर्स ठाण्यात लावण्यात आले असून या बॅनवर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यासमोर उद्धव ठाकरेंनी गुडघे टेकल्याचे व्यंगचित्राच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मागे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे देखील उभे असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

एकीकडे शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर बॅनर्स लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून ठाकरेंना डिवचण्यासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे सभेपूर्वीच ठाण्यातील राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे.

Shivsena
Video Raj Thackeray : राज ठाकरेंचा शरद पवार, उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, म्हणाले, 'मनोज जरांगे यांच्या आडून...'

दरम्यान, आजच्या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नेमकं काय बोलणार याकडे ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच लक्ष लागून राहिलं आहे. दिल्ली दौऱ्यावरुन होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर, महाविकास आघाडीतील जागा वाटप आणि नेहमीप्रमाणे शिंदे गटावर हल्लाबोल करत ठाकरे आपली सभा गाजवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com