Pune Police Corruption : पुण्यात सर्वाधिक लाचखोर पोलीस कुठे? 'एसीबी'ची धक्कादायक आकडेवारी आली समोर...

ACB Bribery Report in Pune : प्रामाणिकपणे आणि रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना अशा काही भ्रष्ट लोकांमुळे समाजासमोर मान खाली घालावी लागते, अशी खंत खुद्द प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. जर ही परिस्थिती बदलली नाही, तर खाकीवरील जनतेचा विश्वास पूर्णपणे उडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
Anti-Corruption Bureau statistics reveal a rise in police bribery cases across Pune region
Anti-Corruption Bureau statistics reveal a rise in police bribery cases across Pune region. Pune Rural recorded the highest number of ACB trap actions during the last 18 months.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 15 Jun : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरांमध्ये पोलीस दलातील भ्रष्टाचाराचे नवनवीन किस्से समोर येत असल्याचं पाहायला मिळत आहेत. अशातच एसीबीची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अवघ्या दीड वर्षात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल २० जणांना सापळा रचून रंगेहात पकडले आहे.

विशेष म्हणजे, या संपूर्ण कारवाईत पुणे ग्रामीण भागातील पोलीस सर्वाधिक भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडले असल्याचे समोर आले आहे. राज्यातील सर्वाधिक शिस्तप्रिय आणि जबाबदार यंत्रणा म्हणून पोलीस दलाकडे पाहिले जाते. समाजात त्यांच्यावर मोठा विश्वास असतो. मात्र, गुन्हेगारांवर कारवाई करणाऱ्या यंत्रणेतीलच काही अधिकारी आणि कर्मचारी जेव्हा स्वतः लाच घेताना पकडले जातात, तेव्हा संपूर्ण दलाची मान शरमेने खाली जाते.

प्रामाणिकपणे आणि रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना अशा काही भ्रष्ट लोकांमुळे समाजासमोर मान खाली घालावी लागते, अशी खंत खुद्द प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. जर ही परिस्थिती बदलली नाही, तर कायद्यावरील आणि खाकीवरील जनतेचा विश्वास पूर्णपणे उडेल, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.

Anti-Corruption Bureau statistics reveal a rise in police bribery cases across Pune region
US Iran Peace Deal : अखेर संपूर्ण जगाचा जीव भांड्यात पडला! ट्रम्प यांच्याकडून युद्ध संपल्याची घोषणा, इराणचीही सहमती, 'या' तारखेला अधिकृत सह्या होणार

संकटात धावून येणारे आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी साभाळणारे पोलीस दल गेल्या काही काळापासून चुकीच्या कारणांमुळेच सातत्याने चर्चेत आणि बदनाम होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. कधी पोलिसच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहत आहे, तर कधी गंभीर प्रकरणांमध्ये 'सेटलमेंट'च्या सुरस कथा समोर येऊ लागल्या आहेत.

गेल्याच महिन्यात पुणे शहर पोलीस दलात सलग झालेल्या लाचेच्या सापळ्यांनी हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, पुणे विभागात लाचखोरीचे मोठे जाळे पसरले आहे. यामध्ये २०२५ ते ७ मे २०२६ या दीड वर्षाच्या कालावधीत पुणे शहरात ६, पिंपरी-चिंचवडमध्ये ५ आणि पुणे ग्रामीण भागात सर्वाधिक ९ अशा एकूण २० कारवाया झाल्या आहेत.

Anti-Corruption Bureau statistics reveal a rise in police bribery cases across Pune region
TMC merger in NCPI : 'खांडू' पॅटर्नने ममता बॅनर्जींना धोबीपछाड : 10 वर्षापूर्वीच लिहिली होती पक्षांतराची 'अरुणाचल प्रदेश' स्क्रिप्ट

एखाद्या तक्रारीवर कारवाई करणे, गुन्ह्यात मदत करणे, चौकशीत सवलत देणे, दाखले देणे किंवा तपासात सहकार्य करणे आणि अटक न करणे अशा विविध कारणांसाठी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये आता "पैसे दिल्याशिवाय पोलीस ठाण्यात कामच होत नाही" अशी अत्यंत नकारात्मक भावना बळावत चालली असून गृहखात्याने यावर कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com