
Pune News : गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या गँगवारमुळे संपूर्ण पुणे हादरले आहे. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बरोबर एक वर्षाने त्यांच्या हत्येचा बदल आंदेकर गँगने घेतला असल्याचे बोललं जात आहे. मात्र हा हत्येचा कट अत्यंत नियोजनपूर्वक आखला असल्याचे आताच समोर येत आहे.
पुण्यातील नाना पेठेतील नवरंग मित्र मंडळाजवळ शुक्रवारी रात्री एका थरारक हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली. या घटनेत गोविंद कोमकर या तरुणाचा पिस्तूलातून गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. गोविंद हा गणेश कोमकर याचा मुलगा असून, गणेश कोमकर हा वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी आहे.
विशेष म्हणजे, हा गुन्हा करताना टोळीने डीजे वर “टपका रे टपका” हे गाणे वाजवले, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आंदेकर टोळीने आधीच या हत्येची योजना आखली होती. गेल्या वर्षी १ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात वनराज आंदेकर याचा कोयत्याने वार करून आणि गोळ्या झाडून खून झाला होता. या प्रकरणात गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड आणि इतर काही जण आरोपी होते. वनराजच्या हत्येनंतर आंदेकर टोळीने अंत्यसंस्कारादरम्यान शस्त्रपूजन करून बदला घेण्याची शपथ घेतली होती. याबाबत पोलिसांना देखील माहिती होती. पोलिसांना याची माहिती असूनही त्यांना ही हत्या रोखता आली नाही.
या हत्येच्या आधी आंदेकर टोळीने आंबेगाव पठार परिसरात रेकी केली होती, परंतु प्रत्यक्ष हल्ला नाना पेठ या ठिकाणी घडवून आणला गेला. आंबेगाव पठार या परिसरात वनराज आंदेकर यांच्या खुनातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते यांच्यासह अन्य 13 जणांची घरे आहेत. या परिसरात रेकी करण्यात येत असल्याच्या संशयावरून भारती विद्यापीठ पोलिसांनी दत्ता बाळू काळे (रा. गणेश पेठ) याला पकडून चौकशी केली असता, त्याच्याकडून हा धक्कादायक माहिती देखील समोर आली होती.
भारती विद्यापीठ पोलिसांनी दत्ता बाळू काळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून ही रेकी करण्यात आली असल्याचं निष्पन्न झालं होतं. या हत्येच्या कटासाठी शस्त्रांची देखील जमाजमा केली असल्याचं समोर आलं होतं. दत्ता काळेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर याबाबत माध्यमांना देखील माहिती देऊन आपण हत्येचा कट उधळला असल्याचे पोलिसांनी सांगितलं होतं. हत्येचा कट उधळला म्हणून पोलिसांनी जरी आपली पाठ थोपटून घेत असताना नाना पेठ येथे हल्ला करत गोविंद कोमकर या तरुणाची हत्या करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.