Pune Police : पोलिसांची हुशारी आता चालणार नाही! खिशात मोबाईल, वॉकीटॉकी ठेवून नाव लपवणं महागात पडणार, नवा आदेश जारी

Pune Police Nameplate Rule : गणवेशावरील नावाची पाटी म्हणजेच नेमप्लेट मुद्दाम मोबाईल, वॉकीटॉकी किंवा चालान मशीनने झाकून घेण्याच्या वाढत्या प्रवृत्तीला अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी जोरदार चाप लावला असून थेट शिस्तभंगाच्या कारवाईचे कडक आदेश जारी केले आहेत.
A Pune Police officer in uniform displaying a clearly visible nameplate while on duty.
A Pune Police officer in uniform displaying a clearly visible nameplate while on duty. The new Pune Police nameplate rule aims to improve transparency and accountability.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 05 Jul : सध्या पोलिसांकडून चुकीची कारवाई सुरू असेल तर नागरिक आपला मोबाईल काढून ती शूट करताना पाहायला मिळतात. तसेच चुकीची कारवाई करणाऱ्या पोलिसांची वरिष्ठांकडे तक्रार देखील केली जाते. मात्र या कारवाईपासून वाचण्यासाठी पोलीस दलात काही कर्मचारी हुशारी दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांकडून नवीन आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे पुणे पोलीस दलात 'स्मार्ट'गिरी करत स्वतःची ओळख लपवणाऱ्या आणि कारवाईच्या नावाखाली नागरिकांना अंधारात ठेवणाऱ्या काही पोलीस कर्मचाऱ्यांचे आता धाबे दणाणले आहेत.

गणवेशावरील नावाची पाटी म्हणजेच नेमप्लेट मुद्दाम मोबाईल, वॉकीटॉकी किंवा चालान मशीनने झाकून घेण्याच्या वाढत्या प्रवृत्तीला अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी जोरदार चाप लावला असून थेट शिस्तभंगाच्या कारवाईचे कडक आदेश जारी केले आहेत.

A Pune Police officer in uniform displaying a clearly visible nameplate while on duty.
Sachin Ahir : ठाकरेंना ज्याची धास्ती तेच सचिन अहिरांनी बोलून टाकलं; 2029 ची विधानसभा निवडणूक आदित्य ठाकरेंना जड जाणार?

​नेमप्लेट लपवण्याचा हा कोणता नवा 'ट्रेंड'?

शहरात वाहतूक नियमन करताना किंवा रस्त्यावर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना अनेक पोलीस कर्मचारी एका वेगळ्याच स्टाईलमध्ये वावरत असल्याचे समोर आले होते. गणवेशाच्या वरच्या खिशात मुद्दाम मोठा स्क्रीन असलेला मोबाईल फोन, शासकीय वॉकीटॉकी किंवा ई-चालान मशीन अशा पद्धतीने ठेवले जायचे, जेणेकरून त्यांच्या नेमप्लेट पूर्णपणे झाकली जाईल.

हा प्रकार अपघाताने नाही तर अत्यंत नियोजनबद्ध रीतीने 'जाणूनबुजून' केला जात होता, जेणेकरून वाद झाल्यास किंवा तक्रार करायची असल्यास नागरिकांना संबंधित पोलिसाचे नावच वाचता येऊ नये. या पार्श्वभूमीवर आता शहरातील सर्व पोलीस ठाणी, वाहतूक शाखा तसेच इतर विभागांना लेखी आदेश पाठवण्यात आले आहेत.

A Pune Police officer in uniform displaying a clearly visible nameplate while on duty.
Shiv Sena news : एकनाथ शिंदेंनी पुन्हा दाखवून दिली ताकद; अंबादास दानवेंच्या साथीने सत्तार, शिरसाट यांच्याकडून मोहीम फत्ते...

प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याची नेमप्लेट कर्तव्यावर असताना स्पष्टपणे दिसेल, याची सर्व जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर टाकण्यात आली असून आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. ​यापूर्वीही पोलीस प्रशासनाने नेमप्लेट स्पष्ट ठेवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र त्याचे पालन होत नसल्याचे वारंवार दिसून आले.

त्यामुळे आता जाणूनबुजून नेमप्लेट झाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. पोलीस दलात शिस्त आणि उत्तरदायित्व वाढवण्यासोबतच नागरिकांना समोर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची ओळख सहज पटावी, हाच या कठोर निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com