Pune Police : पुणे पोलिसांनी विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं : लक्ष्मण हाकेंच्या संरक्षणाबाबतही मोठा निर्णय

Pune Police withdraw security of 25 people : पुणे पोलिसांच्या पोलीस संरक्षण गठित समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील विविध व्यक्तींना पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रातून २५ हून अधिक व्यक्तींचे पोलीस संरक्षण हटवण्यात आल्याची माहिती समोर आली.
Pune Police Security  |Laxman Hake | Vidyanand Bapat
Pune Police Security |Laxman Hake | Vidyanand BapatSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News, 27 Oct : पुणे शहरातील २५ हून अधिक महत्त्वाच्या व्यक्तींना देण्यात आलेले पोलीस संरक्षण हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे पोलीस दलाच्या विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेले आणि त्यानंतर हल्ला झाल्याने पोलीस संरक्षण देण्यात आलेले विद्यानंद बापट यांची सुरक्षाही आता काढून घेण्यात आली आहे.

दुसरीकडे, सध्या फरार असलेल्या बारामतीतील उद्योगपती राणा सूर्यवंशी यांचे वाय प्लस दर्जाचे पोलीस संरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. २३ ऑक्टोबर रोजी पुणे पोलिसांच्या पोलीस संरक्षण गठित समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील विविध व्यक्तींना पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रातून २५ हून अधिक व्यक्तींचे पोलीस संरक्षण हटवण्यात आल्याची माहिती समोर आली.

विद्यानंद बापट यांची सुरक्षा हटवली

सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट हे गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आले होते. त्यांनी ध्वनिप्रदूषणाविरोधात त्यांनी भूमिका घेतल्यानंतर हे प्रकरण चांगलेच गाजले होते. याच वादातून त्यांच्यावर हल्लाही झाला होता. या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आणि त्यांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आले होते. मात्र, आता पुणे पोलिसांच्या सुरक्षा आढावा बैठकीत त्यांची सुरक्षा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune Police Security  |Laxman Hake | Vidyanand Bapat
Pune Graduate Result : पुणे पदवीधरचा निकाल नेमका कधी लागणार? प्रत्यक्ष मतमोजणी संदर्भातील मोठी अपडेट आली समोर

या निर्णयातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे राणा सूर्यवंशी यांचे कायम ठेवण्यात आलेले पोलीस संरक्षण. बारामती विमानतळाजवळ त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या ते फरार असल्याची माहिती असतानाही त्यांना देण्यात आलेले वाय प्लस दर्जाचे एस्कॉर्ट संरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. तरओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याबाबतही संरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना १+१ सशस्त्र पोलीस कर्मचारी आणि एस्कॉर्ट वाहनासह सुरक्षा पुरवण्यात येत आहे.

यांचे पोलीस संरक्षण हटवले

पुणे पोलिसांनी सुरक्षा काढलेल्या व्यक्तींमध्ये सरहद संस्थेचे संजय नहार, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, कोरेगाव भीमा प्रकरणातील वकील आशिष सातपुते, सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला, उद्योजक पुनीत बालन, राजकीय विश्लेषक तहसीन पुनावाला, चित्रपट निर्माते मिहिर कुलकर्णी, अजिंक्य डी. वाय. पाटील, मिशेल योहान पुनावाला आणि योहान झवेरी पुनावाला यांच्यासह काही बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे.

Pune Police Security  |Laxman Hake | Vidyanand Bapat
Pratapsinh Patil leads : विधानपरिषद निवडणुकीचा पहिला कल महाविकास आघाडीच्या बाजूने : मराठवाड्यातून प्रतापसिंह पाटील यांची आघाडी

दर एक-दोन महिन्यांनी सुरक्षेचा आढावा

पुणे शहर पोलीस दलाची विशेष शाखा दर महिन्याला किंवा एक-दोन महिन्यांच्या अंतराने महत्त्वाच्या व्यक्तींना पुरवण्यात आलेल्या पोलीस संरक्षणाचा आढावा घेते. संबंधित व्यक्तींच्या सुरक्षेला असलेला धोका, परिस्थितीतील बदल आणि संरक्षणाची आवश्यकता यांचा विचार करून ही समिती निर्णय घेते. त्यानुसार कोणाचे संरक्षण कायम ठेवायचे, कोणाच्या सुरक्षेत वाढ करायची आणि कोणाचे संरक्षण काढून घ्यायचे, याबाबत निर्णय घेतला जातो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com