Pune Police News : गुन्हेगारांना सरळ करण्यासाठी पुणे पोलिसांकडून 'टायर थेरपीचा' प्रयोग?

Pune Police Action On Criminals : कोयता गँगचा उपद्रव तसेच वाहनांच्या तोडफोडीच्या घटना कमी करण्यासाठी पोलिस आयुक्त काय उपाययोजना राबवणार? याकडे आता लक्ष लागले आहे.
Pune Police News
Pune Police NewsSarkarnama

Pune News : पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, कोयते गँगचा धुमाकूळ तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली राहावी, यासाठी आता पुणे पोलिस सतर्क झाले आहेत. पोलिस दलातील विविध खात्यांतील अधिकाऱ्यांची एक बैठक पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बोलावली आहे. (Latest Political News)

पोलिस मुख्यालयात ही बैठक होणार असून, यामध्ये सर्व पोलिस स्टेशनमधील अधिकारी तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शहरातील गुन्हेगारींवर नियंत्रण आणण्यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. गुन्हेगारांना सरळ करण्यासाठी 'टायर थेरेपी 'चा प्रयोग यापुढील काळात करण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची दाट शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Police News
Sharad Pawar News : कुणाच्या स्वागतासाठी सजले NCP कार्यालय; लंके, मोरे की अन्य कोणी ?

विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, आयटी हब अशी पुणे शहराची ओळख आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरात रस्त्यावरील गुन्हेगारीचे प्रकार वाढले आहेत. वाहनांची केली जाणारी तोडफोड, हातात कोयते घेऊन दहशत पसरविणे, जुन्या भांडणातून केले जाणारे हल्ले, टोळीयुद्ध असे गुन्हे घडत आहेत. यासह महिलांची, मुलींची छेडछाड करणे, सोशल मीडियावर गुन्हेगारांचे स्टेटस ठेवणे, असे प्रकार वाढले आहेत. गेल्या महिन्यात तर शहरात कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जचा साठा पुणे शहर आणि परिसरात सापडला होता. मोठ्या संख्येने तरुणाई ड्रग्जच्या आहारी गेल्याचे या निमित्ताने समोर आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी बोलावलेल्या या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे.

Pune Police News
Pune Loksabha News: मोहोळांच्या प्रचाराचा 'श्रीगणेशा'; पण खासदार कुलकर्णींचा दिल्लीत भेटीगाठींचा धडाका

शहरातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडविणाऱ्या घटकांना सोडू नका. ड्रग्जची सर्रास विक्री होत असल्याने तरुणाई त्याच्या आहारी जात आहे. कायदा मोडणाऱ्याला कोणतीही दयामाया न दाखवता त्याच्यावर योग्य ती कारवाई करा, अशा सूचना पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांना केलेल्या आहेत. कायदा मोडणारा कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याला सुधारण्यासाठी टायरमध्ये घालून हाणा, कायद्यासमोर कोणीही मोठा नाही, असे अजितदादांनी जाहीर भाषणात सांगितले होते. जी मुलं अल्पवयीन असतील, त्यांच्या आई-बाबांना पोलिस स्टेशनमध्ये बोलवून त्यांनी केलेल्या 'कर्तृत्वाची' माहिती द्या. आमच्या पोराने काय केलं आहे, हे आम्हाला माहीत नाही, अशी उत्तरे चालणार नाहीत, असा सज्जड दमदेखील पालकमंत्री अजितदादांनी (Ajit Pawar) दिला होता.

Pune Police News
Sharad Pawar News : कुणाच्या स्वागतासाठी सजले NCP कार्यालय; लंके, मोरे की अन्य कोणी ?

पोलिस आयुक्त म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर अमितेश कुमार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या शहरातील गुंडांना पोलिस आयुक्तालयात एकत्र बोलवून त्यांची परेड घेतली होती. ड्रग्ज विकणारे, कायदा मोडणारे, विविध गुंड प्रवृत्तीच्या टोळीतील प्रमुखांना पोलिस (Police) आयुक्तालयात बोलवून अमितेश कुमार यांनी इशारा दिला होता. सोशल मीडियावर गुन्हेगारीचे समर्थन करणारे व्हिडिओ व्हायरल झाल्यास तुमची खैर नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं होतं. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त यांनी बोलावलेली ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोयता गँगचा उपद्रव तसेच वाहनांच्या तोडफोडीच्या घटना कमी करण्यासाठी पोलिस आयुक्त काय उपाययोजना राबवणार? याकडे आता लक्ष लागले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com