Dattatray Bharne News : 'समजनेवाले को इशारा ही काफी...' ; आमदार भरणेंचं सूचक वक्तव्य!

Dattatray Bharne Vs Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांना इशारा दिल्याचे दिसून आले आहे.
Dattatray Bharne
Dattatray BharneSarkarnama

Indapur Political News : 'भरणे कुटुंब दिवंगत शंकरराव (भाऊ) पाटील यांना मानणारे कुटुंब आहे. भाऊंच्या सांगण्यावरुन 15 ते 20 वर्षापूर्वी इंदापूर सहकारी साखर कारखान्यातील (कर्मयोगी साखर कारखाना) कामगारांच्या पगारासाठी भरणे कुटुंबाने इंदापूर बँकेमध्ये 4 ते 4.5 कोटी रुपयांची ठेव ठेवली होती. कारखाना उभारणी करीत असताना सुरुवातीला कागदपत्रासाठी 3 लाख रुपयांची गरज असताना भरणे कुंटूबाने 1 लाख रुपये दिले होते.'

'माझा जन्मच बंगल्यामध्ये झाला असून पहिली अलिशान गाडी भरणे कुंटुंबाकडे होती व आजही आहे. मला कोणावरती टीका करायची नसून समजनेवाले को इशारा ही काफी होता है.' असे सांगून आमदार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांना इशारा दिल्याचे दिसून आले.

सन 1992 साली, 1995 साली कोणाची काय परस्थिती होती. याविषयी मला काही बोलायचे नाही. आम्हाला ही आरोप करता येतात. उगाच खोटे- नाटे आरोप करणार असाल तर ते चुकीचे असल्याचे सांगून समजनेवाले को इशारा काफी होता है. असे भरणे यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dattatray Bharne
MLA Dattatraya Bharne : ...अन् गावकऱ्यांनी आमदार भरणेंची थेट हत्तीवरूनच मिरवणूक काढली!

सध्या इंदापूर(Indapur) तालुक्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भाजपच्या वतीने जिल्हा परिषद गटामध्ये संकल्प 2024, संकल्प विजयाचाचे मेळावे सुरु आहेत. भाजपच्या मेळाव्यामध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

तर भाजप (BJP )व राष्ट्रवादीच्या काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षाच्या युतीचा धर्म असल्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सुचनेमुळे राष्ट्रवादीचे नेते,पदाधिकारी गप्प असल्याचे दिसत असून भरणे यांनी मात्र टीका न करता अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

आम्हाला आमच्या पक्षश्रेष्ठींचा आदेश मान्य आहे. लाेकसभा-विधानसभा निवडणूकीमध्ये पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्यानुसार आम्ही काम करणार आहोत. उगाच आत्तापासुन आरोप-प्रत्यारोप करुन काही उपयोग होणार नाही. उगाव काव -काव, चाव-चाव करुन उपयोग होणार नसल्याचे भरणे यांनी सांगितले.

Dattatray Bharne
Shivtare's Big Announcement : विजय शिवतारेंनी दंड थोपटले; ‘बारामतीतून अपक्ष लोकसभा लढवणार...'

यावेळी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे (Hanumant Kokate) यांनी सांगितले की, मी कोणाला घाबरत नाही.सर्व पक्षांची युती झाली आहे. नेत्यांचा आदेश असून कुणावरती टीका टिपणी करु नका. मी आदेशामुळे टीका करणार नाही. 2019 विधानसभा निवडणूकीमध्ये आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) 3200 मतांनी विजयी झाले होते. मात्र 2024 च्या निवडणूकीमध्ये विकासकामांच्या जोरावर ३२ हजार मतांनी निवडून येणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com