Pune politics : पुण्याच्या राजकारणात मोठी घडामोड! ब्राह्मण समाजानं वाढवलं भाजपसह इतर राजकीय पक्षांचं टेन्शन, नवा पर्याय निवडण्याच्या तयारीत

Brahmin community political move in Pune : पुण्यात ब्राह्मण समाज नवा राजकीय पर्याय निवडण्याच्या तयारीत असल्याने भाजपसह सर्व पक्षांचं टेन्शन वाढलं आहे.
Pune politics
Pune politicsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण संघटनांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुणे शहरात 16 ते 18 टक्के ब्राह्मण समाज असून त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिनिधित्व दिले नाहीत तर वेगळा निर्णय घेण्यात येईल असा इशारा ब्राह्मण समाजाच्या संघटनांनी दिला आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विश्वजीत देशपांडे म्हणाले, सकल ब्राह्मण समाजाच्या समन्वय समितीची बैठक दोन दिवसापूर्वी संपन्न झाली. त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार आमच्या समन्वय समितीच्या सदस्यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटू आणि निवेदन देऊन काही विनंत्या केल्या आहेत.

Pune politics
Congress leader death : काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला : महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन

पुणे शहरामध्ये ब्राह्मण समाजाची लोकसंख्या ही 16 ते 18% आहे. त्यामुळे 10 ते 12 प्रभागांवर आमचे प्राबल्य असून त्या प्रभागांमध्ये ब्राह्मण समाजाच्या उमेदवारांना संधी दिली जावी ही आमची मागणी आहे. तसेच ज्या खुल्या प्रवर्गाच्या जागा आहेत. त्या ठिकाणी आरक्षित प्रवर्गातील उमेदवार दिले जाऊ नये. त्यामुळे या खुल्या जागांच्या माध्यमातून शहरांमध्ये 30 ब्राह्मण समाजाचे उमेदवार दिले जाऊ शकतात.

त्यानुसार ब्राह्मण समाजातील सक्षम उमेदवारांची यादी आम्ही तयार केली असून ती राजकीय पक्षांना दिली आहे. नगरपालिकांचा विचार केल्यास ब्राह्मण समाजाचे पाच उमेदवार हे नगराध्यक्ष झाले आहेत. तसेच 50 हून अधिक उमेदवार नगरसेवक झाले आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजाची किती ताकद आहे हे समोर आला आहे.

पूर्वी पुणे शहरामध्ये ब्राह्मण समाजाचे 22 नगरसेवक होते. त्यानंतर ती संख्या 16 वर आली आणि मागील निवडणुकत फक्त आठ ब्राह्मण समाजाचे नगरसेवक होते. ती आणखी कमी होऊ नये त्यामुळे संख्येच्या प्रमाणात ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व देण्यात यावं अशी मागणी ब्राह्मण समाजा कडून करण्यात आले आहे.

Pune politics
Arjun Khotkar News : युती करायची की नाही? स्पष्ट सांगा; अर्जुन खोतकरांचा महायुतीला थेट अल्टीमेटम?

आमची मागणी ही सर्व राजकीय पक्षांकडे असणार आहे. आत्तापर्यंत भाजपने आमच्या समाजाला न्याय दिला आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये आमच्या समाजाचा विचार केला नाही तर समाजातील लोक निवडणूक मतदानाच्या वेळी नोटा या पर्यायाचा विचार करतील. असा इशारा देशपांडे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com