NCP BJP alliance : पुण्यात मोठी घडामोड; विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत जाणार, उपमहापौर पदावर डील? माजी खासदाराने टाकला डाव...

Pune politics, Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेत भाजप–अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अधिकृत युती चर्चेत; राष्ट्रवादीच्या सध्याच्या विरोधी भूमिकेवर प्रश्नचिन्ह.
PMC
PMC Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिकेच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात खांद्याला खांदा लावून सत्तेचा गाडा हाकणारे भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आता पुणे महापालिकेतही अधिकृतपणे एकत्रित येण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

'राज्यात एकत्र, मग महापालिकेत का नाही?' असा थेट सवाल उपस्थित करत, भाजपमधून नुकतेच घड्याळ हातावर बांधलेल्या एका नेत्याने एक मोठा डाव टाकला आहे. पुणे महापालिकेत राष्ट्रवादीला सत्ताधारी भाजपसोबत सत्तेत सहभागी करून घेण्याचा आणि उपमहापौरपद पदरात पाडून घेण्याचा एक विशेष प्रस्ताव राष्ट्रवादीकडून तयार केला जात असल्याची 'इन्साईड स्टोरी' समोर आली आहे.

सर्वप्रथम राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या दरबारात हा प्रस्ताव सादर केला जाणार असून तिथून सकारात्मक निर्णय झाल्यानंतर पुढे तो प्रस्ताव भाजप समोर ठेवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पुणे महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून मैदानात उतरले होते.

निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत महापालिकेवर आपला झेंडा फडकावला, तर त्याखालोखाल जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्य विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली. सध्या महापालिकेत भाजपचा महापौर तर राष्ट्रवादीचे निलेश निकम विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहत आहेत. मात्र, राष्ट्रवादी विरोधी बाकांवर असली तरी तिची भूमिका नेहमीच सत्ताधारी भाजपला पूरक आणि मवाळ राहिली असल्याचा आरोप महापालिकेतील काँग्रेसने सातत्याने केला आहे.

काँग्रेसच्या याच आरोपांना आता या नव्या राजकीय हालचालींमुळे बळ मिळताना दिसत आहे, कारण उघडपणे विरोधात असणारी राष्ट्रवादी आता थेट भाजपच्या गळ्यात गळा घालण्याच्या अधिकृत तयारीत आहे. दुसरीकडे, महापालिकेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनीही या प्रस्तावाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत भाजपमधून नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या माझी खासदाराच्या सुरात सूर मिसळला आहे.

पक्षाच्या आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हितासाठी, तसेच प्रलंबित जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी जर कोणी असा प्रस्ताव देत असेल आणि त्यावर पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला, तर आपण सर्व नगरसेवक पक्षश्रेष्ठींच्या निर्णयासोबत उभे राहू, अशी स्पष्ट भूमिका निकम यांनी मांडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com