Pune Porsche Accident : विशाल अगरवाल यांचा पाय आणखी खोलात, पोलिस दोन गुन्हे दाखल करणार, कारण...

Vishal Agarwal News : विशाल अगरवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्यांच्याकडून वेगवेगळी माहिती गोळा केली जात आहे.
Vishal Agarwal
Vishal Agarwalsarkarnama

Pune Accident News in Marathi : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातामधील 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीचे विशाल अगरवाल हे वडील आहेत. त्यांनीच आपल्या अल्पवयीन मुलाला पार्टी करण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्यासाठी पोर्श गाडी दिली होती.

याच गाडीने अपघात झाला होता. विशाल अगरवाल ( Vishal Agarwal ) यांच्या अल्पवयीन मुलाने मद्य पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवून एका दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की यात दुचाकीवरून चाललेल्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. मुलगा अल्पवयीन असताना देखील वडील विशाल अगरवाल यांनी त्याला गाडी आणि हॉटेलमध्ये जाऊन मद्य पिण्याची परवानगी दिल्याने पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दखल करून त्यांना अटक केली आहे. त्यांची सध्या चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिस चौकशीत विशाल अगरवाल यांच्याकडून वेगवेगळी माहिती गोळा केली जात आहे. त्यामधून काही महत्वाची माहिती समोर आली आहे. त्यावरून आता बांधकाम व्यावसायिक असलेल्या विशाल अगरवाल यांच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. भरधाव वेगाने गाडी चालवून दोन जणांचा बळी घेतलेल्या या अल्पवयीन आरोपीच्या बाजूला त्यांचा फॅमिली ड्रायव्हर बसला होता.

Vishal Agarwal
Amitesh Kumar Porsche Car Accident : आरोपीला वाचवण्यासाठी ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न, पोलिस आयुक्तांनी दिला दुजोरा

हा अपघात ज्यावेळेस झाला त्यावेळी अल्पवयीन मुलगा नव्हे, तर मी गाडी चालवत होतो, असं पोलिसांना खोटं सांग असं विशाल अगरवालने ड्रायव्हरला सांगितल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कलम 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.

याबरोबरच 'आरटीओ'च्या तक्रारीनंतर बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्यावर कलम 420 च्या अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोर्श कारची नोंदणी झालेली नव्हती. असे असताना देखील गाडीची नोंद झाल्याची खोटी माहिती दिल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

( Edited By : Akshay Sabale )

Vishal Agarwal
Amitesh Kumar Porsche Car Accident : आरोपीला वाचवण्यासाठी ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न, पोलिस आयुक्तांनी दिला दुजोरा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com