Pune Porsche Accident : RTO चा गरिबांना दंड, श्रीमंतांकडे कानाडोळा; दोघांना चिरडणारी 'पोर्श' विनानोंदणीच धावली...

Pune Porsche Car Accident News : नोंदणी न करता आणि क्रमांक नसताना गाडी रोडवर आणली कशी? मालकानं कर भरला नसेल, तर गाडी जप्त का केली नाही? असे सवाल उपस्थित होत आहेत.
Pune Porsche Car
Pune Porsche Carsarkarnama

Pune Accident News, 21 May : नवीन वाहन कोणत्याही शोरूममधून घेतल्यानंतर ती नोंदणी करत संपूर्ण जबाबदारी शोरूम मालकाची असते. जोपर्यंत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत वाहन संबंधित मालकाला सोपवलं जात नाही. पण, कल्याणीनगरमध्ये अपघात करून दोघांचा बळी घेणारी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल ( Vishal Agrawal ) यांची पोर्श ही अलिशान गाडी त्यास अपवाद ठरली. पोर्श गाडी नावावर करण्यासाठी 20 मार्चला अर्ज करण्यात आला. त्या गाडीची पाहणी करून सुमारे 40 लाख कर भरण्यास सांगितलं. मात्र, कर न भरल्यानं नावावर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही.

त्यामुळे नोंदणी न करता आणि क्रमांक नसताना गाडी रोडवर आणली कशी? मालकानं कर भरला नसेल, तर गाडी जप्त का केली नाही? असे सवाल उपस्थित होत आहेत. या गाडीचा अपघात होऊन दोघांचा बळी जाण्यास 'आरटीओ'चे अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नवीन गाडी घेतल्यावर शोरूम चालकानं 'आरटीओ'कडून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करूनच मालकाला गाडी देणं आवश्यक आहे. पण, मुंबईतील एका डिलरने 20 मार्च रोजी परराज्यातून पोर्श गाडी आणून दिली होती. गाडी नावावर करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर 'आरटीओ' अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. त्यानुसार सुमारे 40 लाखांचा कर भरण्यास सांगितला होता. कर भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी शोरूम चालकाची होती. पण, 'आरटीओ'कडे नोंदणीची प्रक्रिया पूर्ण नाही.

त्यामुळे त्या अल्पवयीन मुलानं विनाक्रमांक नव्हे, तर नोंदणी न केलेली गाडी चालवली होती. आता ज्या दिवसापासून गाडी खरेदी केली, तेव्हापासून कराच्या रकमेवर दंडाची रक्कम आकारली जाणार आहे. त्यासह विनाक्रमांक गाडी रस्त्यावर आणनं हा मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा आहे. तसेच, वाहन चालविण्याचा परवाना नसणे हा देखील गुन्हा आहे. त्यामुळे पोर्श गाडी चालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

Pune Porsche Car
Pune Porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या मुसक्या आवळल्या...

मृतांच्या नातेवाईकांना विम्याची रक्कम मिळणार का?

दोघांचा बळी घेणाऱ्या पोर्श गाडीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली नाही. गाडीचा विमा ही उतरवला गेला नाही. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना विम्याची रक्कम मिळणार की नाही, या विषयी साशंकता निर्माण झाली आहे.

Pune Porsche Car
Pune Porsche Accident Case : कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसच आरोपींच्या पिंजऱ्यात; न्यायालयीन चौकशी करण्याची विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची मागणी !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com