Pune Porsche Accident : मोठी अपडेट : पोर्श अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या मित्रांना पोलिस करणार साक्षीदार !

Porsche Accident Update : अपघातानंतर पोलिसांनी त्याचे वडील विशाल अगरवाल, आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल, आई शिवानी अगरवाल यांच्यासह ससूनमधील दोन डॉक्टर, एक शिपाई, ज्या पबमध्ये जाऊन या मुलाने दारू प्यायली त्याचे मालक, मॅनेजर, काही कर्मचारी अशा दहा जणांना आतापर्यंत अटक केली आहे.
Porsche Car Accident Case
Porsche Car Accident CaseSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या मित्रांकडे पोलिसांनी तपास करण्यास सुरूवात केली आहे. या मित्रांकडे केलेल्या चौकशीत अनेक महत्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली असून या मुलाने केलेला गुन्हा सिद्ध व्हावा, यासाठी या मुलाच्या मित्रांना साक्षीदार करण्याची तयारी पोलिसांनी सुरु केली आहे. अपघात झालेल्या रात्री आपण दारू प्यायलो होतो, अशी कबुली या अल्पवयीन आरोपीने दिली असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

दोन आठवड्यापूर्वी (19 मे ) कल्याणीनगर भागात मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या पोर्श कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा ही भरधाव वेगाने कार चालवित असल्याचे समोर आले आहे.

हा अपघात (Accident) झाल्यानंतर या परिसरातील नागरिकांनी गाडीतून बाहेर काढून या अल्पवयीन मुलाला चांगलाच चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी हा बिल्डरचा मुलगा असल्याने त्याला वाचविण्याासाठी सुरूवातीपासूनच जोरदार प्रयत्न करण्यात आले. विशेष म्हणजे या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झालेला असतानाही या अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने 15 तासात जामीन देखील मंजूर केला होता. यावर समाजातील विविध स्तरातून जोरदार प्रतिक्रिया उमटल्यानंतर मुलाला दिलेला जामीन रद्द करून त्याला 14 दिवस बाल सुधारगृहात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

या अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातानंतर पोलिसांनी त्याचे वडील विशाल अगरवाल, आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल, आई शिवानी अगरवाल यांच्यासह ससूनमधील दोन डॉक्टर, एक शिपाई, ज्या पबमध्ये जाऊन या मुलाने दारू प्यायली त्याचे मालक, मॅनेजर, काही कर्मचारी अशा दहा जणांना आतापर्यंत अटक केली आहे.

या अल्पवयीन मुलाने केलेला गुन्हा आपल्या नावावर घ्यावा, यासाठी अगरवाल कुटूंबाने त्यांच्या ड्रायव्हरवर दबाव टाकून त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांच्या (Police) तपासात समोर आले आहे. हा अपघात झाला त्यावेळी या अल्पवयीन मुलाबरोबर गाडीत त्याचे काही मित्र देखील होते. ते अल्पवयीन असल्याने सध्या पोलिसांनी त्यांची नावे जाहिर केलेली नाहीत. मात्र त्यांची चौकशी करून त्यांच्याकडे तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Porsche Car Accident Case
Pune Porsche Accident : रक्ताचा नमुना बदलण्याची आयडीया कोणाची, आरोपीच्या आईचा मोठा खुलासा

या अपघाताबाबत पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची चौकशी केली. सुरुवातीच्या काळात त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यानंतर त्याने अपघाताच्या रात्री दारू प्यायलो असल्याची कबुली पोलिस तपासात दिल्याचे समजते. या अल्पवयीन मुलाच्या मित्रांकडे देखील पोलिसांनी चौकशी केली असून ही केस अधिक स्ट्राँग व्हावी, यासाठी पोलिसांनी साक्षीदार करण्याची तयारी सुरू केली आहे. हे मित्र प्रत्यक्ष अपघात घडला त्यावेळी उपस्थित असल्याने त्यांनी दिलेली साक्ष महत्वपूर्ण ठरून संबधित अल्पवयीन मुलाला शिक्षा होण्यास मदत होऊ शकते, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Porsche Car Accident Case
Pune Porsche Accident : पोर्श अपघातानंतर आलिशान कारमधून 'ससून'मध्ये आलेले 'ते' दोघे कोण? पोलिसांचं मौन का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com