Pune Porsche Accident : पोर्श अपघातानंतर आलिशान कारमधून 'ससून'मध्ये आलेले 'ते' दोघे कोण? पोलिसांचं मौन का?

Pune Porsche Accident News Latest Updates : रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकरणात विशाल अगरवाल आणि आई शिवानी अगरवाल यांना शनिवारी पोलिसांनी अटक केली आहे.
Pune Porsche Accident
Pune Porsche AccidentSarkarnama
Published on
Updated on

Pune Porsche Crash News : कल्याणीनगर अपघात प्रकरणात मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाल (Vishal Agarwal) आणि आई शिवानी अगरवाल यांना अटक करण्यात आली आहे.

पण, मुलाचा रक्तनमुना घेताना उपस्थित असलेल्या दोन जणांविरोधात पुणे पोलिसांकडून (Pune Police) अद्यापही कोणतेही पावले उचलण्यात आलेली नसल्याचं दिसून येत आहे. ससून रूग्णालयातील 'सीसीटीव्ही' कॅमेरात ते दोघे कैद झाले आहेत. पण, नंतरही पोलिसांचे मौन का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकरणात विशाल अगरवाल आणि आई शिवानी अगरवाल यांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. शिवानी यांनी मुलाला वाचविण्यासाठी स्वत:चे रक्त तपासणीसाठी दिल्याची कबुली दिली. विशाल अगरवालच्या सांगण्यावरून ससूनमधील डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी शिवानी यांचा रक्ताचा नमुना घेतल्याचं उघडकीस आलं आहे.

याप्रकरणी डॉ. अजय तावरे, डॉ. हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. विशालनं घटकांबळे याच्याशी संपर्क साधला तसेच, दोन मध्यस्थांच्या माध्यमातून हाळनोरला तीन लाख रूपये दिल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. मात्र, एवढं सगळे करताना पुणे पोलिसांनी ससून रूग्णालयात उपस्थित असणाऱ्या दोघांबाबत अद्याप काहीच भूमिका घेतलेली नाही.

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident : रक्ताचा नमुना बदलण्याची आयडीया कोणाची, आरोपीच्या आईचा मोठा खुलासा

पोलिस ठाण्यातही तेच होते?

ससून रूग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना घेताना तिथेत अन्य उपस्थिती असल्याचं 'सीसीटीव्ही'त दिसून आले आहेत. त्या दोघांची ओळख पटली आहे. अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना येरवडा पोलिस ठाण्यातही ते दोघे उपस्थित होते.

पोलिसांच्या उपस्थितीत रक्ताचा नमुना बदलला?

अपघातानंतर येरवडा पोलिस (Police) ठाण्यात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिस कर्मचारी त्याला ससून रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन केले. रूग्णालयात तपासणीवेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी मुलासोबत उपस्थित राहणं अपेक्षित होतं.

पण, एका आलिशान कारमधून तिथे तीन व्यक्ती पोहोचल्या. पोलिस असताना रक्तनमुना घेईपर्यंत त्या व्यक्ती तिथे उपस्थित होत्या. मुलासोबत आणि ससून रूग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधताना हे कसं शक्य झालं. पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखलं नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident : शिवानी अगरवालला अटक!, आज न्यायालयात हजर करणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com