Nashik News : रक्षकच बनला भक्षक, पतीला ठार करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार, पोलिसाला अटक

Police Officer Arrested in Nashik for Assault on Woman : वर्दीतले रक्षकच भक्षक बनले तर लोकांनी कुणावर विश्वास ठेवायचा ? नाशिकमध्ये तसाच एक संतापजनक प्रकार घडला आहे. एका शिक्षिकेवर एका पोलीस कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Nashik News
Nashik NewsSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime News : 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. मात्र वर्दीतले रक्षकच भक्षक बनले तर लोकांनी कुणावर विश्वास ठेवायचा ? नाशिकमध्ये तसाच एक संतापजनक प्रकार घडला आहे.

एका शिक्षिकेवर एका पोलीस कर्मचाऱ्याने मानसिक आणि शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षक महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याचे आमिष दाखविणाऱ्या शहर पोलिस दलातील अमंलदाराने पीडितवेर बलात्कार केला. नंतर लग्नाला नकार दिल्यावर तरुणीने दुसऱ्याशी विवाह केला असता, संशयित अंमलदाराने तिच्या पतीला अपघातात ठार करण्याची धमकी देत पुन्हा बलात्कार केला. अखेर नाशिक शहरातील इंदिरानगर पोलिस ठाण्यात तरुणीने तक्रार दिली. संशयित पोलिस अंमलदाराविरोधात बलात्कारासह धमकावल्याचा गुन्हा दाखल करीत संशयिताला अटक करण्यात आली आहे.

Nashik News
Ajit Pawar : "मला नरकाचं माहिती नाही स्वर्गाचं असेल तर..."; राऊतांच्या 'नरकातील स्वर्ग' पुस्तकावरून अजितदादांची टोलेबाजी

अभी ऊर्फ चंद्रकांत शंकर दळवी (वय ३५) असे संशयित पोलिस अंमलदाराचे नाव आहे. तो म्हसरुळ येथे, केतकीनगर ला राहतो. पोलिस आयुक्तालयाकडून शनिवारी (दि.१७) त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस दलाच्या प्रतिमेला अशोभनीय कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून खातेअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

२५ वर्षीय तरुणीच्या फिर्यादीनुसार, संशयित अभी हा शहर आयुक्तालयाच्या दंगल नियंत्रक पथकात आहे. संशयित अभी याने पीडितेशी कौटुंबिक संबंध निर्माण करीत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर राणेनगर येथील कशिश लॉज, सातपूर येथील सिटाडेल, डोंबिवली रेल्वेस्थानकाजवळील लॉजमध्ये पीडितेला नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तिच्याशी विवाहाचा देखावा करून घरी नांदण्यास नेले नाही. 'माझ्या घरच्यांची विवाहाला संमती नाही', असा दावा करून तिची फसवणूक केली.

Nashik News
Gulabrao Patil Politics: मंत्री गुलाबराव पाटील यांचा स्वबळाचा कल वाढवणार जळगावमध्ये भाजपची डोकेदुखी?

त्यानंतर १५ फेब्रुवारी २०२४ ला पीडितेने दुसऱ्या युवकाशी विवाह केला आणि तिचा संसार सुरळीत सुरू असताना, संशयित अभी दळवी याने पुन्हा पीडितेकडे शारीरिक सुखाची मागणी केली. त्यासाठी त्याने तिच्या पतीचा अपघात करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा पीडितेच्या इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवले. अखेर पीडितेने इंदिरानगर पोलिस ठाणे गाठून तक्रार केली असता, ते बलात्कारासह धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. संशयित अभी दळवी यास अटक करण्यात आली आहे.

संशयित आरोपी चंद्रकांत दळवी यांच्याविरुद्ध यापूर्वीही धमकी दिल्याप्रकरणी बीएनएस ३५१ (४) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच मागीलवर्षी १२ जुलै रोजी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com