Porshe Accident News : पोलिसांनी कायद्यानुसार त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल करावा, आमदार धंगेकरांची मागणी !

MLA Ravindra Dhangekar : रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत शहरात पब व बार सर्रासपणे उघडे राहतात. त्यामुळे अनेक गैरप्रकार घडत आहेत. याबाबत अनेक नागरिकांनी आम्ही लोकप्रतिनिधी असल्याने आमच्याकडे तक्रारी मांडल्या. त्याचा पाठपुरावा करत सातत्याने पोलीस प्रशासनासमोर विविध माध्यमातून वारंवार मांडल्या मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले...
Ravindra Dhangekar- C.P Amitesh Kumar
Ravindra Dhangekar- C.P Amitesh KumarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यात एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारूच्या नशेत भरधाव कार चालवत मध्यरात्री दुचाकीवरील दोघांना उडवल्याची घटना घडली आहे. कल्याणीनगर येथे घडलेल्या या घटनेमध्ये दुचाकीवरील निष्पाप तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याचं कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.

या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा शहरातील पब आणि बारकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. आमदार धंगेकर म्हणाले, मी सुरवातीपासून ओरडून सांगत आहे की, शहरात बार आणि पब हे उशिरापर्यंत उघडे ठेवू नका. तशी परवानगी देखील देऊ नका. पण माझे म्हणणे पोलीस प्रशासनाने कधीही ऐकले नाही. रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत शहरातील पब व बार सर्रासपणे उघडे असतात. त्यामुळे अनेक गैरप्रकार घडत आहेत. अपघातही (Accident) वाढत आहेत. याबाबत अनेक नागरिकांनी आम्ही लोकप्रतिनिधी असल्याने आमच्याकडे तक्रारी देखील मांडल्या. त्याचा मी सातत्याने पोलीस प्रशासनासमोर विविध माध्यमातून पाठपुरावा देखील केला. मात्र याकडे पोलिस आयुक्तांनी गांर्भियाने पाहिलेच नाही, असा आरोप आमदार धंगेकर यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravindra Dhangekar- C.P Amitesh Kumar
Mumbai South-Central Voting LIVE: 'चोरलेल्या धनुष्यबाणाचे ते चुंबन घेताहेत...'; राज यांच्या मतदानावर राऊतांची टोलेबाजी

कल्याणीनगर येथे घडलेली घटना रात्री उशिरापर्यंत पब आणि बार सुरू ठेवल्यामुळेच घडली आहे, असे अनेकांचे मत आहे. ही अत्यंत हाय प्रोफाईल केस असल्याने सर्व प्रसारमाध्यमांत झळकली. पण अनेक गोरगरीब सामान्य लोकांना रात्री उशिरापर्यंत पब आणि बार सुरू ठेवल्याचा त्रास होत आहे. हेही अतिशय संवेदनशीलतेने पाहणे आणि त्याचा विचार करणे आवश्यक आहे.

या निमित्ताने मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करत आहे की, शहरातील आणि बारच्या वेळा बदलून त्या कमी करा. यामुळे पुण्याची संस्कृती तर टिकून राहीलच. शिवाय गैरप्रकार, अपघात येतील. असा मला विश्वास वाटतो, असे आमदार धंगेकर यांनी पोलिस (POLICE) आयुक्त अमितेश कुमार यांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे. अल्पवयीन मुलाच्या हातात वाहने देणे पालकांनी टाळलेच पाहिजे.

Ravindra Dhangekar- C.P Amitesh Kumar
IAS Tukaram Munde : तुम्हाला माहित आहे का तुकाराम मुंडेंनी मतदान केले का...? आणि कुठे...?

कल्याणीनगर येथे मध्यरात्री घडलेल्या घटनेतील आरोपी हा अल्पवयीन आहे. त्यामुळे पोलिसांनी कायद्यानुसार त्याच्या वडिलांवर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे. या मुलाचे वडील एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत, म्हणून त्यांना सोडून देऊ नये. पोलिसांनी यामध्ये कडक भुमिका घेतली तरच नागरिकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होऊन येणाऱ्या काळात हे चुकीचे प्रकार थांबतील,असेही धंगेकर यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Ravindra Dhangekar- C.P Amitesh Kumar
Thackeray Brother Voting News : ठाकरे बंधूंनी कुटुंबीयांसह बजाविला मतदानाचा हक्क ! मतदान केल्यानंतर म्हणाले..,

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com