Pune News, 31 Aug : पुणे महानगर पालिकेच्या प्रभाग रचनेवरून आता पुण्यात महायुतीतच धुसफूस सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, प्रभागरचनेसंदर्भात अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत.
त्यामुळे युतीच्या नादाला न लागता आणि प्रभागरचनेवर रडत न बसता निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवारांनी प्रभाग रचनेवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महत्वाचं म्हणजे याच बैठकीत त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील उघड नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे मुरलीधर मोहोळ यांचे काम केले. त्यामुळे प्रभाग रचना करताना आपल्या राष्ट्रवादीचा विचार करणे गरजेचे होतं. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी फक्त भाजपचाच विचार केला. मित्र पक्षांचा विचार त्यांनी केला नाही, असं म्हणत अजितदादांनी नाराजी दर्शवली.
मात्र, त्याचवेळी अजितदादांनी सुरेश कलमाडी यांचं उदाहरण देत प्रभाग रचनेचा काही परिणाम होणार नसल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, मागे सुरेश कलमाडी यांनी देखील त्यांच्या पद्धतीने प्रभागरचना केली होती. तरीही त्यावेळी राष्ट्रवादीचाच महापौर झाला होता. ही आठवण सांगत एक प्रकारे अजित पवारांनी भाजपला अप्रत्यक्षपणे इशाराच दिला.
त्यामुळे प्रभाग रचनेवरून महायुतीत धुसफूस सुरू असल्याचं दिसत आहे. शिवाय युतीच्या नादी न लागता आणि प्रभागरचनेवर रडत न बसता निवडणुकीच्या तयारीला लागा. निवडणुकीसाठीच्या तीन महिन्यांत कष्ट करणारेच निवडून येतील.
निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पुण्यात महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्रित लढणार की स्वतंत्र लढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.