Pune News: पुणे जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्हा प्रशासनाने महसूल विभागात थेट 'खांदेपालट' करण्याचा धडक निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी आणि महसूल सहाय्यक अशा तब्बल २८५ कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया आज सोमवारी पार पडणार आहे.
या बदल्यांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील हालचालींना वेग आला असून अनेक वर्षांपासून एकाच जागी ठाण मांडून बसलेल्यांना आता नव्या जागी धाडण्यात येणार आहे.अनेकदा बदल्यांच्या प्रक्रियेत राजकीय दबाव, वशिल्याचे तट्टू आणि पडद्यामागून होणाऱ्या 'अर्थपूर्ण' हालचालींची चर्चा रंगत असते; मात्र पुणे प्रशासनाने यावेळी वेगळा मार्ग निवडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात सकाळी १० वाजल्यापासून थेट 'समुपदेशन' प्रक्रियेद्वारे ही पदस्थापना करण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांची पात्रता, त्यांचा अनुभव आणि त्यांची कार्यक्षमता पाहूनच जागा निश्चित केल्या जाणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या बदल्यांच्या एकूण गणितावर नजर टाकली, तर बदलीस पात्र ठरलेल्या २८५ कर्मचाऱ्यांमध्ये १०७ ग्राम महसूल अधिकारी, ३४ मंडळ अधिकारी, ५७ सहाय्यक महसूल अधिकारी आणि ८७ महसूल सहाय्यक यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात ९२९ मंजूर ग्राम महसूल अधिकारी पदांपैकी ८८२ पदे सध्या कार्यरत आहेत, ज्यातील १०७ जणांना थेट दुसऱ्या टेबलचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेबाबत सांगताना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी स्पष्ट केले की, बदलीची ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने आणि शासनाच्या नियमांनुसारच राबवली जात असून कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप किंवा दबाव खपवून घेतला जाणार नाही.
बदल्या म्हटल्या की लोकप्रतिनिधींचे फोन खणखणणे आणि लेटरहेड फिरणे हे नित्याचेच असते, पण यावेळी प्रशासनाने आधीच कडक पावले उचलली आहेत. जर या बदल्यांबाबत राजकीय किंवा इतर कोणताही बाह्य दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तर संबंधित कर्मचाऱ्यांवर 'महाराष्ट्र नागरी सेवा नियम' अंतर्गत थेट कारवाई करण्याचा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच जे कर्मचारी या समुपदेशन प्रक्रियेला दांडी मारून अनुपस्थित राहिले, त्यांची कोणतीही सोय न पाहता उपलब्ध रिक्त पदांवर प्रशासकीय सोयीनुसार थेट पदस्थापना दिली जाईल, असा सज्जड दमही देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.