Positive News: हातात 'मन में हैं विश्वास' अन् थेट विश्वास नांगरे-पाटलांचा कॉल! विकास खारगेंनी युवकाचं स्वप्नच पूर्ण केलं

Vikas Kharge Connects Youth With His Role Model Vishwas Nangare Patil: नंदुरबारमधील अक्षय गांगुर्डे हा युवक विश्वास नांगरे-पाटील यांचे पुस्तक वाचत असताना अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी त्याला थेट नांगरे-पाटील यांच्याशी संवाद साधून दिला.
Maharashtra Positive News
Maharashtra Positive NewsSarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

Nandurbar News: कधी कधी आयुष्यात असे काही क्षण येतात, जे फक्त आठवणीत राहत नाहीत तर आयुष्यभरासाठी प्रेरणा बनून जातात. नंदुरबार जिल्ह्यातील वाघाळे गावातील अक्षय गांगुर्डे या युवकासाठी असाच एक अविस्मरणीय क्षण आज घडला.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा अक्षय गावातील अभ्यासिकेत बसून आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचे ''मन में हैं विश्वास' हे पुस्तक वाचत होता. पुस्तकातील प्रत्येक पानासोबत तो स्वतःची स्वप्नेही रंगवत होता. त्याचवेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे अभ्यासिकेच्या पाहणीसाठी आले.

पुस्तकात रमलेल्या अक्षयकडे पाहून खारगे यांनी सहज विचारले, "विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी कधी बोलला आहेस का?" यावर अक्षयने लाजतच उत्तर दिले, "नाही सर, बोलायची भीती वाटते."

अक्षयचे उत्तर ऐकताच विकास खारगे यांनी क्षणाचाही विलंब न लावता मोबाईल काढला आणि थेट विश्वास नांगरे-पाटील यांनाच फोन लावला!

Maharashtra Positive News
Congress News: ममतादीदी-शरद पवार काँग्रेसमध्ये आले तर काँग्रेस मजबूत होईल की नव्या संकटात सापडेल? जाणून घ्या 10 शक्यता

ज्या व्यक्तीला तो आपला आदर्श मानत होता, ज्यांचे पुस्तक हातात घेऊन तो अभ्यास करत होता, त्यांचाच आवाज अचानक फोनवर ऐकू आला. अक्षयचा आनंद शब्दांत मावणारा नव्हता.

मात्र या संवादातील सर्वात खास क्षण अजून यायचा होता.

अक्षयशी बोलताना विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, "अक्षय, तुझा रोल मॉडेल जरी मी असलो, तरी माझे रोल मॉडेल तुझ्यासमोर उभे असलेले आदरणीय विकास खारगे सर आहेत."

हे शब्द ऐकताच अभ्यासिकेतील वातावरण भारावून गेले. एका युवकाचा आदर्श आणि त्या आदर्शाचा आदर्श एकाच क्षणी त्याच्यासमोर उभा होता. अक्षयसाठी हा क्षण एखाद्या स्वप्नपूर्तीसारखाच होता.

Maharashtra Positive News
Shalarth ID News: शालार्थ आयडी मंजुरीसाठी सरकारने ठरवली कालमर्यादा; शिक्षक-कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

काही मिनिटांचा हा साधा संवाद होता, पण त्याने वाघाळे गावातील अनेक युवकांच्या मनात मोठी प्रेरणा निर्माण केली. मोठी स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी यशस्वी माणसे किती सहजपणे आधार देऊ शकतात, याचे हे सुंदर उदाहरण ठरले.

Maharashtra Positive News
Nashik MLC: माघार घेतली, प्रचार थांबवला, तरीही गितेंचा समर्थकांसह फेरफटका सुरुच; नरेंद्र दराडे गोंधळले?

कधी कधी एका फोन कॉलची किंमत लाखमोलाची असते. कारण तो फक्त संवाद घडवत नाही, तर एखाद्याच्या स्वप्नांना नवी उंची देऊन जातो. काही मिनिटांच्या संवादाने केवळ अक्षयच नव्हे, तर वाघाळे गावातील प्रत्येक युवकाच्या मनात आत्मविश्वासाची नवी ज्योत पेटवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com