Pune Revenue Officers Party : बावनकुळेंच्या खात्यातील अधिकाऱ्यांची 'अनधिकृत रिसॉर्ट'मध्ये पार्टी; वडेट्टीवारांचं ट्विट, आता अद्दल घडणार?

Congress Vijay Wadettiwar tweet Pune revenue officers Revenue Minister Chandrashekhar Bawankule : पुण्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत.
Pune revenue officers
Pune revenue officersSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजप प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल खात्याचे अधिकारी अनधिकृत रिसॉर्टमध्ये कशी पार्टी करतात, यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर पार्टीचे व्हिडिओ शेअर करत महसूल मंत्र्यांच्या खात्यात काय सुरू आहे, याकडे लक्ष आहे का? असा प्रश्न विचारला आहे. यावर मंत्री बावनकुळे यांनी देखील प्राथमिक माहिती घेतली असून, दोषींवर कारवाई होईल, असे संकेत दिले आहेत.

अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची पार्टी? जनता करत भरते, महसूल अधिकारी अनधिकृत रिसॉर्टवर मौज करतात!, असे म्हणत पुण्यातील खेडमधील एका अनधिकृत रिसॉर्टमध्ये ही पार्टी झाल्याचा दावा करणारे ट्विट काँग्रेसचे (Congress) विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या एक्स खात्यावर व्हिडिओसह पोस्ट केले आहे.

Pune revenue officers
APMC Election Mumbai : अजितदादांची 'चुप्पी', नाईकांना श्रेष्ठींचा 'आदेश', पवारांच्या शिलेदाराची 'मूकसंमती' अन् मुंबई बाजार समितीचं राजकारण..!

पुण्यातील (Pune) खेडमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची पार्टी रंगली, त्यात उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे डान्स करत सहभागी झाले. ही पार्टी ज्या रिसॉर्टमध्ये झाली, ते रिसॉर्टच अनधिकृत असल्याचा आरोप आहे! असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Pune revenue officers
BJP Maharashtra Politics : ठाकरेंची शिवसेना फोडाफाडीत व्यग्र, त्याच शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून 600 तक्रारी; मंत्री नाईकांचा लगेचच स्वबळाचा सूर

एकीकडे सामान्य नागरिकांवर लहानसहान कारणांसाठी कारवाई केली जाते, अनधिकृत बांधकामे तोडली जातात, तर दुसरीकडे महसूल अधिकारीच अनधिकृत रिसॉर्टवर मजा करत आहेत. महसूल मंत्र्यांच्या खात्यात काय सुरू आहे, याकडे लक्ष आहे का?, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची दखल घेतली असून, त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. "या पार्टीची माहिती मिळाली आहे. प्राथमिक अहवालानुसार ते रिसॉर्ट अनधिकृत असल्याची देखील माहिती मिळते. यात अधिकारी दोषी असतील, तर त्यांच्यावर खात्यामार्फत चौकशी होऊन कारवाई होईल", असे महसूलमंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com