Amol Mitkari : ...म्हणून रोहित पाटलांना मुख्य प्रतोद केलं; 'चंगु मंगू'ना उत्तर देणार नसल्याचा रोहित पवारांचा मिटकरींना टोला

Rohit Pawar proposed roles for Patil, Jankar, and Awhad: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड, मुख्य प्रतोद पदी रोहित पाटील आणि प्रतोद म्हणून उत्तम जानकर यांची निवड करण्यात आली आहे.
Rohit Patil
Rohit PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांची आणि नवनिर्वाचित आमदारांची काल बैठक झाली. या बैठकीमध्ये पक्षाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड, मुख्य प्रतोद पदी रोहित पाटील आणि प्रतोद म्हणून उत्तम जानकर यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना डावलण्यात आलं असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची टीका अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे. या साऱ्या घडामोडींवर रोहित पवार यांनी खुलासा केला आहे.

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रोहित पवार म्हणाले, "आमदारांच्या बैठकीमध्ये जेव्हा कोणाला पद द्यायचं, अशी चर्चा सुरू होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत मीच विनंती केली की रोहित पाटील, उत्तम जानकर आणि जितेंद्र आव्हाड यांना त्या संधी द्याव्यात. त्याबाबतचा प्रस्ताव मीच ठेवला होता. त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला असं बोलणं चुकीचा आहे".

Rohit Patil
Rahul Gandhi : 'राहुल गांधी हाजिर हो'; 'या' प्रकरणात पुणे कोर्टाने बजावलं समन्स

तसेच येता काळामध्ये जे संविधानिक पद असतं ज्या कमिटीमध्ये विरोधी पक्षातील आमदारांचा समावेश असतो, त्या ठिकाणी मला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जी काही पद काल देण्यात आली ती अत्यंत विचारपूर्वक देण्यात आली असून त्यामध्ये सर्वांची संमती होती, असं रोहित पवार म्हणाले.

Rohit Patil
Baba Adhav on Vinod Tawde News : तावडेंचा उल्लेख करत बाबा आढाव उद्धव ठाकरेंसमोरच म्हणाले, 'तो प्रांत राऊतांचा मी...'

म्हणून आर पाटलांना संधी

रोहित पाटील यांच्यासारख्या नवख्या नेत्याला हे पद का देण्यात आलं? याबाबत बोलताना रोहित पवार (Rohit Patil) म्हणाले, "मुख्य प्रतोद काम नक्कीच महत्त्वाचं असतं. मात्र आमच्याकडे आता नेते कमी राहिले आहेत. त्यामुळे शरद पवार यांचे प्रयत्न आहेत की नवीन लोकांना संधी द्यायची आणि त्यांना घडवायचं. मी गेल्या पाच वर्षांमध्ये आमदार असताना मुख्य प्रतोदचे काय काम असताना हे मला समजलेले आहे". त्यामुळे त्या जबाबदारीची मला माहिती असताना पुन्हा मीच त्या पदावर बसणं हे योग्य नव्हतं. त्यामुळे एखाद्या नवख्याला त्या ठिकाणी जबाबदारी दिल्यास तो योग्य प्रकारे ते पार पाडू शकेल आणि त्यांच्या मदतीला आम्ही सर्व आहोतच, असं रोहित पवार म्हणाले.

अनेकांना भिडलो...

'मी जिल्हा परिषदमध्ये असताना तसेच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये देखील कोणतही पद घेतलं नव्हतं. मात्र येत्या काळामध्ये माझ्या अनुभवाला आणि जो संघर्ष मी केला आहे. अनेकांना भिडलो आहे त्यामुळे त्याचा विचार करून साजेस पद मला मिळेल', असा मला विश्वास आहे..

अजितदादांनाच उत्तर देणार

जयंत पाटील यांनी बाल मित्र मंडळाच्या नेत्याचा करेक्ट कार्यक्रम केला, "अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली होती. त्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, त्या पक्षामधून माझ्यावर जर अजित पवार यांनी टीका केली, तर मी त्याला उत्तर देईल. मात्र त्यांच्या आसपासचे जे चंगु-मंगू आहेत. जे टीव्हीवर येण्यासाठी प्रतिक्रिया देतात त्यांच्यावर बोलणार नाही".

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com