Pune News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना फोनवरून अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणात वसंत मोरे यांनी थेट मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचे नाव घेतले होते. त्यानंतर आता साईनाथ बाबर यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. या पत्रांमधून काही खुलासे देखील त्यांनी केले आहेत.
वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे प्रवेश केल्यानंतर मनसे आणि वसंत मोरे यांच्या मधला संघर्ष बळवल्याचं पाहायला मिळत आहे. वसंत मोरे यांच्या समर्थकांनी मनसे पदाधिकाऱ्याला सोशल मीडिया वर अपमान जनक भाषा वापरल्याप्रकरणी मनसेकडून संबंधित कार्यकर्त्यांनी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन वसंत मोरे यांना देखील आरोपी करण्याची मागणी केली होती.
यानंतर काही तासातच वसंत मोरे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार सोशल मीडिया वर व्हायरल झाला. धमकी प्रकरणामध्ये वसंत मोरे यांनी थेट मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचे नाव घेतल्याचे समोर आलं होतं. त्यानंतर आता साईनाथ बाबर यांनी आक्रमकपणे उत्तर दिलं आहे. बाबर यांनी पुणे पोलिसांना (Police) पत्र लिहून संबंधित धमकी प्रकरणाची कसून चौकशी करून संबंधित व्यक्तीवर ते कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा व्यक्ती वसंत मोरे यांच्या संबंधित असू शकतो असा देखील दावा या पत्रात करण्यात आला आहे.
वसंत मोरे यांनी धमकी दिल्याची तक्रार पोलिसांना केली आहे. सदर तक्रारीची कसून चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पुणे शहराचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष सुधीर धावडे यांनी फेसबुक या समाज माध्यमावर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजा संदर्भात केलेल्या एक पोस्ट वर आलेल्या कमेंटनुसार वसंत मोरे आणि त्याचे साथीदार यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. सदर बाबत पोलिस कारवाई करत आहेत.
सदर बाब मी पुणे शहर अध्यक्ष या नात्याने पत्रकार परिषद घेतली होती. पोलिसांकडे कारवाईची मागणी देखील केली होती. यामुळे चिडून जाऊन वसंत मोरे हे काही महिन्यापूर्वी घडलेल्या किंवा आलेल्या एका फोन कॉल वरून पोलिसानांकडे तक्रार करून हेतुपुरस्सर आरोप करीत आहे. सदर बाब अत्यंत गंभीर आहे. सदर फोन करणाऱ्या मंडळीचा वसंत मोरेंशी संबंधित असण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाला जुन्या घटनांमध्ये ओढून गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना योग्य धडा शिकवण्यासाठी सबंधित गुन्ह्याचा सखोल तपास करावा व यातील आरोपी जर यांच्याशीच संबंधित असेल तर वरील तक्रारदारांच्या विरोधात कडक कारवाई करावी असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.