Pune News : पुणे शहरातील शाळांना सोमवारी (ता.19) जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पुणे जिल्ह्यात येणार आहे. त्यामुळे पुणे शहरातील फर्ग्यूसन रस्ता, गणेशखिंड रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि त्याला जोडणारे उपरस्ते हे बंद राहणार आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे,
छत्रपती शिवाजीनगर घोले रोड, विश्रामबाग वाडा कसबा, ढोले पाटील रोड, भवानी पेठ, औध बाणेर, कोथरुड बावधन, सिंहगड रोड, वारजे कर्वेनगर या क्षेत्रीय कार्यालयातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गणेश खिंड रस्ता (रेंजहिल्स काॅर्नर ते खैरेवाडी शिवाजीनगर दरम्यानचा)
हाॅटेल सिम्पनीकडून रेंजहिल्स काॅर्नरकडे येणारा रस्ता
औंध, पिंपरी-चिंचवड कडुन येणारे वाहन चालकांनी ब्रेमेन चौक स्पायसर कॉलेज मार्गे आयुका गेट -आंबेडकर चौक खडकी मार्गे इच्छित स्थळी जावे
बाणेर, पाषाण कडुन येणारे वाहन चालकांनी पुणे विदयापीठ कॉसमॉस बँक उजवीकडे युटर्न - सेनापती बापट जंक्शन सेनापती बापट रोड पत्रकारनगर मार्गे इच्छित स्थळी जावे
बाणेर, पाषाणकडून येणारे वाहन चालकांनी बावधान चांदणी चौक कोथरुड मार्गे इच्छित स्थळी जावे.
पुणे विदयापीठ कॉसमॉस बँक लेन डावीकडे भोसलेनगर भोसलेनगर रिक्षा स्टैंड डावीकडे रेंजहिल्स रोड - सिम्पनी सर्कल मार्गे इच्छित स्थळी जाये
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.