Pune Fake Note Scam : पुण्यात चाललंय काय? पोलिसांनी जप्त केल्या तब्बल 28 लाखांच्या बनावट नोटा

Pune Police Seize 28 Lakh Fake Currency : पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 28 लाख रूपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
Fake Currency Pune news
Fake Currency Pune newsSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 29 Apr : पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 28 लाख रूपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

अशातच आता पुण्यात (Pune) बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघडकीस आलं आहे. त्यामुळे पुण्यात नेमकं काय चाललंय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पुण्यातून तब्बल 28 लाख 66 हजार 100 रुपयांचा बनावट नोटा जप्त केल्या.

Fake Currency Pune news
Sinhagad Road Flyover Pune : पुणेकरांसाठी मोठी बातमी! सिंहगड रोडवरील उड्डाणपूलावरून वाहतूक सुरू होणार

धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये दोन महिलांचा सहभाग आहे. मनीषा ठाणेकर, भारतीय गवंड, सचिन यमगर,नरेश शेट्टी, प्रभू गुगलचड्डी अशी आरोपींची नावं आहेत.

आरोपींकडून एक प्रिंटर मशीन तसेच 500 आणि 200 रुपयांच्या नोटांचे प्रिंटेड गठ्ठे जप्त करण्यात आले आहेत. तर 2 लाख 4 हजार रुपयांच्या खऱ्या नोटा देखील पोलिसांनी (Police) हस्तगत केल्या आहेत.

Fake Currency Pune news
India Attack Possibility : ‘’भारत कधीही हल्ला करू शकतो, सैन्य अलर्टवर; खुद्द पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनाच धडकी!

दरम्यान, आरोपींनी या बनावट नोटा बँकेत जमा केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. मात्र, या रॅकेटमागे आणखी कोणाचा हात आहे? याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com