Pune Shivsena UBT : चंद्रकांत मोकाटे संतापले! आयुक्तांच्या केबिनमध्ये गेले, अन् घडाघडा बोलले...

Chandrakant Mokate Meet PMC Commissioner Rajendra Bhosale : या आंदोलनाच्या माध्यमातून कोथरूडच्या नागरी प्रश्नांवर आवाज उठवत मोकाटे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे बोलले जात आहे.
Pune Shivsena UBT
Pune Shivsena UBTSarkarnama
Published on
Updated on

Pune News : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात येऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली. तसेच पुण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनमध्ये जोश भरत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या.

उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी उचल खाल्ली आहे. त्यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघात भेटीगाठी वाढवल्या आहेत. तसेच मंगळवारी त्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळातसह महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन कोथरूडमधील पूर परिस्थितीबाबत खडे सवाल केले.

मोकाटे यांनी नदी सुधार प्रकल्प माध्यमातून आणि बिल्डर व्यवसायिकांकडून नदीपात्रात टाकण्यात येत असलेल्या राडाराड्याबाबत चिंता व्यक्त केली. हा राडारोडा तातडीने महापालिका प्रशासनाने उचलावा. तसेच संबंधितांना नोटीस द्याव्यात, अन्यथा शिवसेना ठाकरे गट तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. या आंदोलनाच्या माध्यमातून कोथरूडच्या नागरी प्रश्नांवर आवाज उठवत मोकाटे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे बोलले जात आहे.

ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाचं म्हणणं काय?

पुणे शहरातील मुळा, मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पांतर्गत सुरू आहे. या कामामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात राडाराडा टाकून व डीपीआरच्या विरुद्ध झालेल्या कामाने नदीपात्र अरुंद झाले आहे. परिणामी पावसाळ्यात खडकवासला धरणातील विसर्गामुळे मुळा, मुठा नदीपात्रालगतच्या नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागतो. यात निंबज नगर, एकता नगरी, पुलाची वाडी व पाटील इस्टेट झोपडपट्टी आदी परिसरातील नागरिकांचे संसार उघड्यावर येतात. तर काहींना जीवाही गमवावा लागतो.

या परिस्थितीची पाहणी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे युवा नेते व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांनी केली. पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. मुळा, मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प कसा सदोष आहे, हेही त्यांनी पर्यावरण अभ्यासकांच्या मदतीने पुणेकरांना सांगितले. त्यानंतर पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहरात येऊन पूर्व बाधित ठिकाणांबाबत माहिती घेतलेली आहे.

आता या दोन्ही नेत्यांनी पूरस्थितीबाबत केलेल्या तक्रारी आणि सूचनांबाबत महानगरपालिकेने काय उपाययोजना केल्या, याची स्पष्टता मिळालेली नाही, असे मोकाटे यांनी स्पष्ट केले. हा प्रकल्प पुणेकरांसाठी धोक्याचा ठरणार असेल तर तो राबवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही त्यांनी केला.

Pune Shivsena UBT
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : मदत सोडून दिल्लीला मुजरा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

या पूर आणि बाधित नागरिकांसाठी महानगरपालिकेने काय ॲक्शन प्लॅन तयार केला आहे? यासाठी चौकशी समिती गठित केली का? नदी सुधार प्रकल्पामुळे पूरपरिस्थिती ओढवली त्याचा अहवाल तयार केला का? बाधितांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था केली का? संबंधित भागांमध्ये परत पाणी घुसणार नाही, यासाठी उपाययोजना केली का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, याकडेही मोकाटेंनी लक्ष वेधले. याबाबत शहराचे प्रशासक म्हणून आपण खुलासा करावा. असे आवाहनही मोकाटेंनी आयुक्त भोसलेंना केले.

पुणेकरांना भाजपने लादलेल्या प्रकल्पातून आलेल्या पुराचा म्हणजेच मानवनिर्मित पुराचा फटका बसल्याचा आरोपही मोकाटेंनी केला. नदीपात्रात भराव टाकल्याने ते अरुंद झाले. तर काही ठिकाणी नदीप्रवाहच बंद आहे. परिणामी धरणातून 35000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला तरी शहराला पुराचा फटका बसतो.

यापूर्वी पावसात धरणातून 65000 क्युसेक पाणी सोडल्यानंतरच पूरस्थिती होत होती. सर्वसामान्य पुणेकरांच्या जिवाशी खेळणारा हा प्रकल्प राज्यातील सत्ताधारी, पुणे मनपातील त्यावेळी प्रकल्पाला मान्यता देणारे सत्ताधारी लोकप्रतिनिधी ठेकेदार, अधिकारी व एजन्ट यांचे भले करणारा आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्दच झाला पाहिजे, असा आग्रह ठाकरे गटाने केला. आता या विषयांबाबत खुलासा व नदीकठ सुधार प्रकल्प रद्द करण्यात यावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशाराही ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला आहे.

यावर महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले Rajendra Bhosale यांनी नदीकाठी टाकलेला राडारोडा त्वरीत उचलला जाईल. तसेच पुरामुळे लागोपाठ दोन तीन वेळा बाधित झालेल्या नागरिकांना तात्पुरते घर देता येईल का, यावर विचार करू, असे आयुक्त म्हणाले. त्यावर शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी बाधितांना मनपाकडे असलेले तात्पुरते घर त्वरीत देणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी नगरसेवक वसंत मोरे, विशाल धनवडे, संजय भोसले, योगेश मोकाटे, जानू आखाडे, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, मकरंद पेठकर, संतोष गोपाळ, प्रथमेश भुकन, अनिल परदेशी, राहुल जेटके,अजय परदेशी, युवराज पारीख, राजू चव्हाण, हरिश्चंद्र सकपाळ, जावेद खान, विनोद वांजळे उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Pune Shivsena UBT
Sharad Pawar Barshi Tour : बार्शीच्या दौऱ्यावर येणारे शरद पवार दिलीप सोपलांवर काय बोलणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com