Parth Pawar News: मोठी बातमी: पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला दणका; सह जिल्हा निबंधक कार्यालयानं दिले 'हे' महत्त्वाचे आदेश

Mundhva Land Scam : मुंढवा परिसरातील 40 एकर जमीन गैरव्यवहारप्रकरणी सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शीतल तेजवानी,अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचे भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Stamp Duty and Registration Department issues  Amedia Enterprises in Pune’s Mundhwa government land case
Stamp Duty and Registration Department issues Amedia Enterprises in Pune’s Mundhwa government land caseSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे शहरातील मुंढवा भागातील 40 एकर जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.या व्यवहारात मुद्रांक शुल्क न भरता सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी 21 कोटी रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे. याबाबत सह जिल्हा निबंधक कार्यालयानं आदेश दिला आहे. तसेच दस्तनोंदणी केल्यापासूनचा 1 कोटी 47 लाखांचा दंडही भरण्याचे निर्देशही दिले आहेत.

मुंढवा परिसरातील 40 एकर जमीन गैरव्यवहारप्रकरणी सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शीतल तेजवानी,अमेडिया कंपनीतील पार्थ पवार (Parth Pawar) यांचे भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आता या जमीन व्यवहार प्रकरणात सह जिल्हा निबंधक कार्यालयानं महत्त्वाचा आदेश दिला आहे.

सह जिल्हा निबंधक कार्यालयानं याप्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.या निकालानुसार पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला सात टक्के मुद्रांक शुल्काचे 21 कोटी आणि 20 मे या दस्त नोंदणीच्या तारखेपासून आजवर असा 1 टक्के प्रमाणे 1 कोटी 47 लाख दंड असे एकूण 22 कोटी 47 लाख रुपये भरावे लागणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे ही रक्कम येत्या दोन महिन्यांतच भरावी लागणार आहे. अन्यथा दरम्यान प्रति महिना 1 टक्का दंड म्हणजेच 21 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. मुदतीत रक्कम न भरल्यास सह जिल्हा निबंधक कार्यालयाकडून ही रक्कम सक्तीनं वसुली करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Stamp Duty and Registration Department issues  Amedia Enterprises in Pune’s Mundhwa government land case
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका? शरद पवार अन् अजितदादांच्या भेटीनंतर 'या' बड्या नेत्यानं घेतली मोदींची भेट

याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावरही आरोप करण्यात येत आहेत. पण, त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यात आलेली नाही.पण दुसरीकडे मुंढवा येथील बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात असलेली सरकारी जमीन कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांनी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील यांना 300 कोटी रुपयांत विकल्याचं समोर आलं होतं.

संतोष हिंगाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,या व्यवहारत जमीनचं खरेदी-विक्री दस्त करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याच्या परवानग्या घेणं आवश्यक होतं.तसेच,5 कोटी 89 लाख 31 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरणं आवश्यक असताना आरोपींनी मुद्रांक शुल्क भरलं नसल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com