Pune Bjp News: पुण्यातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांची जबाबदारी चंद्रकांतदादांवर; 4 मंत्र्यांचीही साथ, शरद लाडांच्या तयारीचा फायदा घेणार

Pune Teacher And Graduate Constituency Election: विधान परिषद निवडणुकीच्या पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. शिक्षक मतदारसंघात शिवसेनेकडूनही मंगेश चिवटे यांनी अर्ज भरला आहे.
Devendra Fadnavis-Ravindra Chavan-Chandrakant Patil
Devendra Fadnavis-Ravindra Chavan-Chandrakant PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News: विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रनधुमाळी सुरू झालेली असताना महायुतीपुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यातच भाजपने या निवडणुकीसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवडणुकीच्या प्रभारीपदाची धुरा सोपविली आहे. तर प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. शिक्षक मतदारसंघात शिवसेनेकडूनही मंगेश चिवटे यांनी अर्ज भरला आहे.

तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीयसहायक प्रा. सचिन सानप यांनी पदवीधर निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे हे दोन्ही अर्ज कायम राहिल्यास भाजपची डोकेदुखी वाढणार असून, ही उमेदवारी मागे घेण्यासाठीचे आव्हान भाजपसमोर आहे.

यापूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपचा दारूण पराभव झाला होता. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपने पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि सर्व घटकांना एकत्र ठेवण्यासाठी निवडणूक समिती गठीत केली आहे.

Devendra Fadnavis-Ravindra Chavan-Chandrakant Patil
Pune MPSC Protest: मोठी बातमी: 'एमपीएससी'चं आंदोलन अडचणीत..? मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल, टेन्शन वाढवणारा मुद्दा उपस्थित

चंद्रकांत पाटील यांच्याकडे 'प्रभारी'पदाची जबाबदारी आहे. त्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे 'सह-प्रभारी'पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

तसेच, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांची 'निवडणूक प्रमुख', तर शरद लाड आणि शिक्षक प्रकोष्ठचे संयोजक डॉ. प्रशम कोल्हे या दोघांकडे सह निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com