Vaishnavi Hagwane : वैष्णवीच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा, हगवणे कुटुंबियांचा भांडाफोड होताच वडील अनिल कस्पटेंनी केली मोठी मागणी

Vaishnavi Hagwane Father’s Allegations : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आता तिच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Vaishnavi Hagwane Murder
Vaishnavi Hagwane Murdersarkarnama
Published on
Updated on

Pune News, 28 May : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आता तिच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ती म्हणजे वैष्णवी यांच्या मृत्यूपूर्वी 24 तासांच्या आत त्यांना गंभीर मारहाण करण्यात आल्याचं या रिपोर्टमधून समोर आलं आहे. त्यामुळे आता वैष्णवीचे वडील यांनी अनिल कस्पटे यांनी ही आत्महत्या नसून माझ्या मुलीचा खून केल्याचं म्हटलं आहे.

वैष्णवीने आत्महत्याकेली नसून तिची हत्याच करण्यात आली आह असून या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. वैष्णवीचा पोस्टमार्टम रिपोर्ट मंगळवारी समोर आला. या रिपोर्टनुसार वैष्णवीच्या शरीरावर 29 जखमा होत्या. यातील 15 मृत्यूपूर्वी 24 तासांत झालेल्या आहेत.

Vaishnavi Hagwane Murder
Anjali Damania On Sanjay Shirsat : जे घरात न्याय देऊ शकत नाहीत, ते सामाजिक न्याय मंत्री होण्यास लायक नाहीत! दमानिया यांचा संताप

त्यामुळे मृत्यूपूर्वी वैष्णवीला मारहाण झाल्याचं स्पष्ट झालं असून तिची आत्महत्या नसून हत्याच आहे, असं माझं ठाम मत असल्याचं अनिल कस्पटे यांनी म्हटलं आहे. शिवाय तिच्या शरीरावरील इतर व्रण आणि जखमा जुन्या असल्याचं सांगितलं जात आहे.

Vaishnavi Hagwane Murder
BJP vs Shivsena UBT : फुसका गृहमंत्री, मोदींना मिठी मारली असती सांगणं हा बाळासाहेबांचा अपमान..., ठाकरेंच्या 'सामना'तून अमित शहांवर जहरी टीका

तसंच या जखमांवरून तिचा छळ सुरू होता हे सिद्ध होत असून या प्रकरणात चांगल्या वकिलाची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. त्यामुळे आता सरकारकडून वैष्णवीच्या वडिलांच्या मागणीवर काय पाऊल उचललं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com