Pune Vehicles: पुणे जिल्ह्यातील वाहन चालकांसाठी टोलनाक्यांवर खास सवलत! जिल्हा प्रशासनानं केली महत्त्वाची घोषणा

Pune Vehicles: ही योजना पुणे जिल्ह्यातील वाहन चालकांसाठी खूपच फायदेशीर ठरणार असून, प्रवासादरम्यान वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.
Toll Plaza
Toll PlazaSarkarnama
Published on
Updated on

Pune Vehicles : पुणे जिल्ह्यातील वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी आहे. खेडशिवापूर, पाटस, सरडेवाडी आणि चालकवाडी टोल नाक्यांवर अव्यवसायिक कार, जीप आणि व्हॅनसाठी वार्षिक टोल फास्टॅग पास योजना सुरू होत आहे. ही घोषणा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांच्या प्रकल्प संचालकांनी केली आहे. या योजनेचा लाभ फक्त अव्यवसायिक वाहनांसाठी आणि प्रवाशांसाठी असेल, ज्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळेल.

Toll Plaza
Rahul Gandhi : राहुल गांधी असणार 2029 मध्ये इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार? तेजस्वी यादव यांनी स्पष्टचं सांगितलं

या वार्षिक टोल फास्टॅग पासची वैधता एक वर्ष किंवा 200 एकेरी फेऱ्यांसाठी यांपैकी जे आधी पूर्ण होईल, त्यानुसार असेल. हा पास केवळ राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्गावरील टोल नाक्यांसाठी वैध असेल. विशेष म्हणजे, या पासची किंमत फक्त तीन हजार रुपये इतकी आहे, ज्यामुळे वाहन चालकांचा आर्थिक भार कमी होईल.

Toll Plaza
Congress New Alligations: "ज्यांची घरं नाहीत ते '0' क्रमांकाच्या घरात राहतात, मग 'हे' क्लाऊड स्टोरेजमध्ये राहतात का?" काँग्रेसचा नवा बॉम्ब

ही योजना प्रवास सुलभ आणि किफायतशीर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. हा वार्षिक टोल फास्टॅग पास मिळवण्यासाठी तसेच त्याच्या सक्रियतेसाठी आणि नूतनीकरणासाठी वाहन चालकांना 'राजमार्ग यात्रा' मोबाईल अॅप किंवा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल.

Toll Plaza
CSDS Apology: महाराष्ट्रातील मत चोरीची आकडेवारी जाहीर करणाऱ्या 'लोकनीती सीएसडीएस'च्या संचालकांचा माफीनामा; म्हणाले, घोडचूक...

याशिवाय, अधिक माहितीसाठी 1033 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. ही योजना पुणे जिल्ह्यातील वाहन चालकांसाठी खूपच फायदेशीर ठरणार असून, प्रवासादरम्यान वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com