Pune ZP Election : पुणे जिल्ह्यातील इच्छुकांसाठी मोठी बातमी! ZP व पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश

Zilla Parishad Election 2025 : मागील चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रशासनाने वेग दिला आहे. पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाबाबत एक महत्त्वपूर्ण आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केला आहे.
District officials conduct the 2025 Pune Zilla Parishad election reservation draw for 73 member seats across talukas, as per updated government regulations.
District officials conduct the 2025 Pune Zilla Parishad election reservation draw for 73 member seats across talukas, as per updated government regulations.Sarkarnama
Published on
Updated on

Pune Newe, 09 Oct : मागील चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रशासनाने वेग दिला आहे. पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाबाबत एक महत्त्वपूर्ण आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केला आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील 73 सदस्य पदाकरिता आरक्षण सोडत 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता, बहुउद्देशीय सभागृह, 5 वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. तसेच याच दिवशी पंचायत समिती सदस्य पदांकरिता आरक्षण सोडतीचे संबंधित तालुक्यात आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत.

District officials conduct the 2025 Pune Zilla Parishad election reservation draw for 73 member seats across talukas, as per updated government regulations.
Sanjay Patil : तासगावच्या संजय काका पाटलांनी भाजप, राष्ट्रवादीशी असलेली नाळ तोडली; सवता सुभा मांडत केली 'ही' मोठी घोषणा

याकरिता सोडत कार्यक्रमाचे 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता तालुकानिहाय आयोजन करण्यात आले आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड, मुळशी, वेल्हे आणि पुरंदर पंचायत समितीचे आरक्षण सोडत संबंधित पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

तर शिरूर पंचायत समितीची सोडत नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, शिरूर, मावळ पंचायत समिती - भेगडे लॉन्स, वडगांव मावळ, ता.मावळ, हवेली - उद्यान प्रसाद कार्यालय, 1712/1 बी, सी व्ही जोशी मार्ग, खजिना विहीर चौक, माडीवाले कॉलनी, सदाशिव पेठ, दौंड पंचायत समिती - बैठक सभागृह, दुसरा मजला, नविन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय.

District officials conduct the 2025 Pune Zilla Parishad election reservation draw for 73 member seats across talukas, as per updated government regulations.
Prakash Ambedkar on RSS : CJI गवईंवरील हल्लाप्रकरणी प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक दावा; म्हणाले, ‘तो’ वकील RSS च्या शाखांमध्ये...

दौंड, भोर - अभिजीत मंगल कार्यालय, भोर महाड रस्ता, भोर, बारामती पंचायत समिती- कवी मोरोपंत सभागृह, इंदापूर रस्ता, बारामती आणि इंदापूर पंचायत समितीची आरक्षण सोडत राधिका रेसिडेन्सी क्लब, इंदापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2025 तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ.चारुशीला देशमुख-मोहिते यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com