Pune ZP Elections : पुणे जिल्हा परिषदेची सत्ता 'हे' तीन तालुकेच ठरवणार! अजित पवारांचा कस लागणार! भाजपच प्रमुख विरोधक!

Pune district rural elections political analysis : पुणे परिषदेमध्ये ७३ गट असले, तरी प्रत्यक्षात प्रत्येकी आठ गट असलेल्या तीन तालुक्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या असणार आहेत.
Pune Zilla Parishad election
Pune Zilla Parishad electionSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar vs BJP in Pune ZP elections: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येत्या ५ फेब्रुवारीला होत आहेत. या निवडणुकीच्या तयारीसाठी तालुक्यांमध्ये स्थानिक पातळीवर बैठका, चर्चासत्रे आणि तडजोडी जोरात सुरू झाल्या आहेत.

इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मोर्चेबांधणीला गती दिली असून, जिल्हा परिषद गटात दोन पंचायत समितींचे गण समाविष्ट असल्याने एकत्रित पॅनल तयार करण्यासाठी व्युहरचना आखली जात आहे. दुसरीकडे, प्रमुख राजकीय पक्षांमध्ये जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरण जुळवण्यासाठी युती-आघाडीच्या हालचाली वेगाने पुढे सरकत आहेत.

पुणे जिल्हा परिषदेवर गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता कायम राहिली आहे. २०१७ च्या ७५ सदस्यांच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेना १३, भाजप ७, काँग्रेस ७, अपक्ष व इतर काही जागा मिळाल्या होत्या.

त्यानंतर जवळपास चार वर्षांच्या प्रशासक काळानंतर आणि बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट पडल्यामुळे, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला आणि अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवारांना सत्ता टिकवणे हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान ठरले आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट (शरद पवार आणि अजित पवार) सर्व तालुक्यांमध्ये एकत्र येण्याची चिन्हे दिसत नाहीत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्ह्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला काही तालुक्यांमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या ताकदीचा सामना करावा लागणार आहे. शिवसेनील फूटीमुळे या निवडणुकीत भाजपच अजित पवारांची मुख्य विरोधक असेल.

Pune Zilla Parishad election
Baramati Election: बारामतीत राष्ट्रवादीकडून सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग; नेमका काय झाला फायदा?

त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी एकतर्फी राहणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे. विरोधी पक्षातील ताकदवान उमेदवारांना अजित पवार गटाकडून आकर्षित करण्याच्या प्रयत्न सुरू आहेत, तर त्यांचे विरोधकही जुळवाजुळवी करून सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान जिल्हा परिषदेमध्ये ७३ गट असले, तरी प्रत्यक्षात आठ गट असलेल्या जुन्नर, खेड आणि इंदापूर तालुक्यांतील निकालावर सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात द्यायच्या, हे ठरणार आहे. तर प्रत्येकी सात जागा असलेल्या दौंड आणि शिरूर या तालुक्यांतदेखील जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या समीकरणांमध्ये निर्णायक ठरू शकतात. याशिवाय बारामती तालुक्यात अजित पवार गटाच्या समोर विरोधक कशी मोट बांधणार, हेदेखील महत्त्वाचे आहे.

तालुकानिहाय जिल्हा परिषदेचे गट

जुन्नर ८, आंबेगाव ५, शिरूर ७, खेड ८, मावळ ५, मुळशी ३, हवेली ६, दौंड ७, पुरंदर ४, वेल्हे २, भोर ४, बारामती ६, इंदापूर ८; एका गटामध्ये दोन पंचायत समिती गण असल्याने तालुका पंचायत समितीमध्ये गटाच्या तुलनेत दुप्पट पंचायत समिती सदस्यांची संख्या आहे.

Pune Zilla Parishad election
Nashik municipal election : 'तुला गायबच करतो...' विरोधात प्रचार केला म्हणून शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची बांधकाम कंत्राटदाराला धमकी, थेट घरात घुसून धक्काबुक्की

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com