Pune ZP President 2026: तब्बल ४८ वर्षांनंतर केंदूर-पाबळ गटाला ZP अध्यक्षपद मिळणार का? माजी सभापतींसह 14 सरपंच एकवटले

14 Sarpanchs unite for Kendur Pabal ZP leadership: बापूसाहेब थिटे हे सन १९७८ मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. पुढे त्यांची राजकीय वाटचाल दोनदा आमदार, खासदार, गृहराज्यमंत्री अशी राहिली. मात्र पुढे तब्बल ४८ वर्षे पुन्हा या गटाला, भागाला पुणे जिल्हा परिषदेत कुठलेही मोठे स्थान वा पद मिळाले नाही.
Ajit Pawar group decision on Pune ZP President 2026
Ajit Pawar group decision on Pune ZP President 2026Sarkarnama
Published on
Updated on

Pune ZP President Election 2026: शिक्रापूर (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता अध्यक्षपदासाठी कुणाची वर्णी लागणार, याबाबत ग्रामीण भागात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यंदा अध्यक्षपद खुले असल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी अनुभवी सदस्यांवर विश्वास दाखवणार की नवख्या चेहऱ्यांना संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंदूर-पाबळ गटाचे सदस्य तथा मुळ केंदूर (ता.शिरूर) येथील (स्व.) बापूसाहेब थिटे हे सन १९७८ मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. पुढे त्यांची राजकीय वाटचाल दोनदा आमदार, खासदार, गृहराज्यमंत्री अशी राहिली. मात्र पुढे तब्बल ४८ वर्षे पुन्हा या गटाला, भागाला पुणे जिल्हा परिषदेत कुठलेही मोठे स्थान वा पद मिळाले नाही.

पर्यायाने हा अन्याय दूर करण्याची संधी यावेळीच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाने आली असून जिल्ह्यात विक्रमी अशा १९ हजार ६२३ एवढ्या मताधिक्याने विजयी झालेले प्रफुल्ल शिवले यांना अध्यक्ष करण्यासाठीची मागणी या गटातील १४ गावांनी केली असून त्याचे नेतृत्व माजी सभापती सदाशिवराव थिटे हे करीत आहेत.

शिरुरच्या राजकारणावर नेहमीच प्रभाव राहिलेला परिसर म्हणजे केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गट. स्व.बापूसाहेब थिटे यांच्यानंतर सदाशिवराव थिटे, भाऊसाहेब साकोरे, उज्वला गायकवाड, सुभाष उमाप हे शिरुर पंचायत समितीच्या सभापतीपदावर राहिले आहेत तर राजेंद्र रासकर, सविता प-हाड यांना उपसभापतीपदाची संधी मिळालेली आहे. अर्थात पुणे जिल्हा परिषदेत जयश्री पलांडे, मंगलदास बांदल, स्व.बाळासाहेब खैरे, नंदकुमार पिंगळे, सविता बगाटे हे दिग्गज गेले खरे मात्र यातील कुणाचीही दखल त्या-त्या वेळीच्या पक्षश्रेष्ठींनी घेतली नाही.

पर्यायाने बापूसाहेब थिटे हे ४८ वर्षांपूर्वी अध्यक्ष झाले होते, त्यानंतर हा गट वंचित आहे. यावेळी या गटातून प्रफुल्ल शिवले यांनी मतांचा चमत्कार करुन तब्बल १९ हजार ६२३ एवढे मताधिक्य घेतले असून वढु बुद्रुक या नावाजलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ते सन २०१० ते पुढील पाच वर्षे सरपंच राहिले असून अजुनही त्या ग्रामपंचायतीवर त्यांचाच ’होल्ड’ आहे.

Ajit Pawar group decision on Pune ZP President 2026
Pune BJP Congress Rada: काँग्रेस भवन दगडफेक: भाजपचे घाटे, काँग्रेसचे शिंदे यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

सद्यस्थितीत पुणे जिल्हा परिषदेवर आता राष्ट्रवादीचे पूर्ण बहुमत असून जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघातील शिरुरमधील तीन गटापैकी केवळ केंदूर-पाबळ गटातच पक्षाला मोठे यश मिळाले आहे.

या मतदारसंघातील आंबेगावातून विवेक वळसे पाटील, अरुण गिरे यांना यापूर्वी उपाध्यक्षपदाची संधी दिली गेली, मात्र शिरुर वंचितच राहिल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. वळसे पाटील, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील आणि शिरुर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी आपले वजन वापरल्यास केंदूर-पाबळ गटाला नक्की अध्यक्षपद मिळेल म्हणून या गटातील सर्व १४ गावातील सरपंच-उपसरपंचांसह अनेक पदाधिका-यांनी आपली मागणी निवेदने वरील पक्षश्रेष्ठींसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचेकडे पाठविल्याची माहिती माजी सभापती सदाशिवराव थिटे यांनी दिली.

Ajit Pawar group decision on Pune ZP President 2026
India Corruption: सर्वांत भ्रष्ट देश कोणते? भारताचा क्रमांक कितवा

सदाशिवराव थिटे यांनी उघडली मागणी आघाडी

या सर्व निवेदनासाठी पाबळचे सरपंच सोपान जाधव, केंदूरच्या सरपंच अलका बापूसाहेब प-हाड, मुखईचे सरपंच रमेश पलांडे, धामारीचे सरपंच अर्जुन भगत, वाजेवाडीचे सरपंच पुनम चौधरी, करंदीच्या सरपंच सुनिता ढोकले, वढु बुद्रुकचे सरपंच कृष्णा आरगडे, खैरेनगरचे माजी सरपंच संदीप खैरे, हिव-याचे माजी सरपंच राहूल टाकळकर, जातेगाव खुर्दचे सरपंच आदीं पदाधिकारी पुढे आले असून वळसे पाटील, आढळराव पाटील व आमदार माऊली कटके, माजी सभापती प्रकाश पवार यांचे मार्फत राष्ट्र्वादीच्या श्रेष्ठींकडे सदर मागणीचा पाठपूरावा करणार असल्याचे सांगितले.

तीनही जागा विक्रमी मतांनी विजयी केल्यात...!

ज्या पाबळ-केंदूर गटात कधी नव्हे एवढ्या १९ हजार ६२३ मतांच्या मोठ्या मताधिक्याने शिवले विजयी झाले तर पाबळ गणात वंदना प्रकाश पवार या ३७६१मतांनी तर केंदूर गणात सुचेता थिटे या ७३३५ एवढ्या विक्रमी मतांनी विजयी झाल्यात. पर्यायाने गेले काही निवडणूकांमध्ये या गटात राष्ट्रवादीसाठी मोठा संघर्ष होता. राष्ट्रवादीने एकतर्फी विजय मिळविल्याने पक्षाने ४८ वर्षांनंतर अध्यक्षपदाची संधी देण्याची मागणी सर्वस्तरांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या 73 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने 51 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यानंतर अध्यक्षपदाबाबत चर्चा सुरु झाली आहे. विजयी उमेदवारांच्या नावांचे गॅझेट बुधवारी (ता. 11) प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे लवकरच अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com