Rahul Kalate News : राहुल कलाटेंनी सुजात आंबेडकरांना दिल्या शुभेच्छा अन् राजकीय वर्तुळात रंगली चर्चा!

Sujat Ambedkar Birthday : ठाकरे शिवसेनेचा पालिकेतील माजी गटनेता म्हणून नाही, तर 'असा' स्वत:चा उल्लेख करत कलाटेंनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Rahul Kalate and Sujat Ambedkar
Rahul Kalate and Sujat AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad Shivsena : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांचे पुत्र सुजात यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सोमवारी त्यांच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठऱला आहे.

मागीलवर्षी फेब्रुवारीत झालेल्या चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कलाटे(Rahul Kalate) यांनी बंडखोरी केली. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्याविरुद्ध ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले. त्यांनी 44 हजार 112 म्हणजे विजयी झालेल्या महायुतीच्या (भाजप) उमेदवार अश्विनी जगतापांच्या लीडपेक्षा (36,168) आठ हजार 944 मते जास्त घेतली.

परिणामी काटेंचा पराभव झाला. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने त्यांची हकालपट्टी केली. दुसरीकडे वंचित आघाडीची ठाकरे शिवसेनेशी आगामी लोकसभेसाठी युती झाल्यात जमा आहे. पुढे वंचित आघाडीतही सामील होऊ शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Kalate and Sujat Ambedkar
DCM Ajit Pawar: अजितदादा...तुम्हीसुद्धा...! आधी 'चहापाना'च्या खर्चावरून मुख्यमंत्री शिंदेंना घेरले, आता दीड कोटी मंजूर

या पार्श्वभूमीवर आपल्याला निरोगी दिर्घाय़ूष्य लाभावो, हा जन्मदिवस आपणांसाठी आनंद व यश प्रदान करणारा असावा, हीच सदिच्छा. अशी फेसबुक पोस्ट कलाटेंनी दुपारी टाकली अन् उद्योगनगरीत वेगळीच चर्चा रंगली. शिवसेनेतून(Shivsena) काढण्यात आलेल्या कलाटेंनी पक्षाशी नव्याने सूत जुळलेल्या वंचितच्या तरुण नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने त्याची चर्चा झाली.

यासंदर्भात आपली भूमिका मांडण्यासाठी कलाटे हे प्रयत्न करूनही उपलब्ध होऊ शकले नाहीत. मात्र, त्यांच्या जवळच्या मित्राकडून ती स्पष्ट झाली. कलाटेंचे प्रकाश आंबेडकरांशी(Prakash Ambedkar) चांगले सबंध आहेत. त्यातून त्यांनी चिंचवडच्या पोटनिवडणुकीत गेल्यावर्षी कलाटेंना पाठिंबा दिला होता. या सबंधातूनच कलाटेंनी सुजात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बाकी काही नाही, असे त्यांच्या या निकटच्या मित्राने सरकारनामाला सांगितले.

Rahul Kalate and Sujat Ambedkar
Pune News : मराठा समाज अन् खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण होणार; महापालिकेच्या एक हजार कर्मचाऱ्यांची फौज तयार
Rahul Kalate post
Rahul Kalate postSarkarnama

तसेच अशा अभिष्टचिंतनात पक्षीय मतभेदही आडवे येत नाहीत, असे ते म्हणाले. त्यांच्या या खुलाशाने दुपारच्या सोशल मीडियावरील या शुभेच्छेवरील चर्चेला सायंकाळी विराम मिळाला. दरम्यान, ही शुभेच्छा देताना कलाटेंनी काळजी घेतल्याचे दिसून आले. त्यांनी आपला उल्लेख पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते असा केला नाही. तर फक्त माजी नगरसेवक म्हणून या शुभेच्छा दिल्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com