Bhima Patas News: राहुल कुल यांना शह देण्यासाठी रमेश थोरातांचं भीक मांगो आंदोलन; भीमा पाटसच्या निवडणुकीपूर्वीच नवा वाद पेटला

Bhima Patas Sugar Factory Election Political News: भीमा सहकारी साखर कारखाना लि. मधुकरनगर-पाटसच्या संचालक मंडळ निवडणुकीचा तिढा आता अधिकच रंगू लागला आहे. 2015 नंतर कारखान्याची निवडणूकच झाली नसल्याने संतप्त झालेले सभासद आणि शेतकरी आता आक्रमक पवित्र्यात आले आहेत.
Bhima Patas Sugar Factory Election News
Bhima Patas Sugar Factory Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : भीमा सहकारी साखर कारखाना लि. मधुकरनगर-पाटसच्या संचालक मंडळ निवडणुकीचा तिढा आता अधिकच रंगू लागला आहे. 2015 नंतर कारखान्याची निवडणूकच झाली नसल्याने संतप्त झालेले सभासद आणि शेतकरी आता आक्रमक पवित्र्यात आले आहेत.

भाजप आमदार राहुल कुल हे या कारखान्याचे चेअरमन आहेत. मात्र, कारखान्याची निवडणूक लांबणीवर पडत असल्याने त्यांच्याविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात आणि भीमा पाटस बचाव संघर्ष समितीने थेट शड्डू ठोकला आहे. कारखान्याची निवडणूक घडवून आणण्यासाठी निवडणूक निधी उभारण्याच्या उद्देशाने पाटसमध्ये थेट 'भीक मागो' आंदोलनासह निधी संकलन यात्रेचे आयोजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून संकलन यात्रेचा प्रारंभ

भीमा पाटस बचाव संघर्ष समितीच्या वतीने या निधी संकलन यात्रेचा प्रारंभ पाटस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून करण्यात आला. कारखान्याचे सभासद, शेतकरी आणि हितचिंतकांनी या उपक्रमात सहभागी होत स्वइच्छेने आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. संकलित होणारी सर्व रक्कम पारदर्शकपणे कारखान्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे यांच्याकडे जमा केली जाणार आहे.

भीक मागण्याची वेळ सभासदांवर येणे : माजी आमदार रमेश थोरात

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात म्हणाले, "गेल्या कित्येक वर्षांपासून केवळ कारखान्याने निवडणूक खर्च न भरल्यामुळे ही निवडणूक लांबत गेली आहे. सत्ताधाऱ्यांकडून प्रशासकाचा गैरवापर केला गेला. इतिहासात पहिल्यांदाच कारखान्याच्या निवडणुकीसाठी सभासदांना रस्त्यावर उतरून लोकवर्गणी आणि भीक मागून पैसे जमा करण्याची वेळ आली आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून या सर्व प्रकारची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.

Bhima Patas Sugar Factory Election News
Sunetra Pawar: सुनेत्रा पवार 'गुंगी गुडीया'! काँग्रेसच्या टीकेवर राष्ट्रवादी आक्रमक; इंदिरा गांधींचा इतिहास काढत केला पलटवार

11 वर्षे निवडणूक नाही, उत्तर कोणाकडे?" – वैशाली नागवडे

भीमा पाटस बचाव संघर्ष समितीच्या वैशाली नागवडे यांनीही भाजप नेतृत्वावर जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या, "लोकशाही मार्गाने दर 5 वर्षांनी निवडणूक होणे अपेक्षित असताना 11 वर्षे उलटली तरी निवडणूक होत नाही. कोर्टाच्या आदेशानंतरही कारखान्याचे प्रशासक निवडणूक खर्चाची पूर्ण रक्कम भरत नाहीत. त्यामुळे आज आम्ही सर्व सभासदांच्या सहकार्याने निधी गोळा करत आहोत.पहिल्याच दिवशी 15 लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. हा निधी आम्ही निवडणूक आयोगाकडे जमा करून कारखाना वाचवण्यासाठी निवडणूक लावूनच राहणार."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com